आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी तेलंगणामध्ये; १५ किमी पदयात्रा काढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारपासून दोन दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात राहुल अदिलाबाद जिल्ह्यात १५ किमींची पदयात्रा करणार आहेत. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मल्लू भट्टी विक्रमारका यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांच्या दौऱ्यात देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील स्थितीवर मुख्य भर दिला जाईल.
राहुल गुरुवारी रात्री नृमल शहरात मुक्काम करणार आहेत. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर पक्ष कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तेलंगणा राज्यनिर्मितीचे घेतलेले श्रेय आणि आक्रमक प्रचारानंतरही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. राहुल यांचे गुरुवारी ४ वाजता आगमन होईल आणि त्यानंतर ते उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर नुकतेच आंदोलन केले आहे. ते कारने नृमलकडे जातील. शुक्रवारी सकाळी ७ वाजता वाडियाला गावातून त्यांच्या पदयात्रेला प्रारंभ होईल. यादरम्यान ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.