आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटक पोटनिवडणुकीत दोन्ही जागा काँग्रेसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटकात लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसकडून जनता दल संयुक्त पक्षाला आपल्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंड्या आणि बंगळुरू ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसने धूळ चारली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी झटका बसला.

मंड्या मतदारसंघात काँग्रेसकडून अभिनेत्री रामया रिंगणात होत्या. त्यांनी जेडीयूच्या सी. एस. पुट्टाराजू यांना 67 हजार 611 मतांनी पराभूत केले. बंगळुरू ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसने अभूतपूर्व विजयाची नोंद केली. कारण या मतदारसंघात कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी यांना 1.37 लाख मतांनी पराभूत व्हावे लागले आहे. मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डी. के. शिवकुमार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला.