आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consensus Between BJP And PDP Has Emerged In JK.

मेहबूबा मुफ्ती उद्या घेणार CM पदाची शपथ, आेमर यांना निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्यानियोजित मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री आेमर अब्दुल्ला यांना निमंत्रण पाठवले आहे. त्यांचा शपथविधी एप्रिल रोजी होणार आहे. मेहबूबा साहिबांनी मला निमंत्रण दिले आहे. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेहबूबा राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. सोमवारच्या या समारंभाकडे देशाचे लक्ष लागले आहे. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर जम्मू-काश्मीरमध्येे सरकार अस्तित्वात येणार आहे.
दोन्ही पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर शपथविधीसाठी 4 एप्रिल ही तारीख निश्चित झाली आहे. पीडीपी नेते मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांचे निधन झाल्याने पीडीपीने मेहबूबा मुफ्ती यांची पक्षनेतेपदी निवड केली आहे. मात्र, पीडीपी-भाजपत किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवरून वाद निर्माण झाला होता.

भाजपचे नेते निर्मल सिंग होणार उपमुख्यमंत्री
- चार एप्रिलला महबूबा मुफ्ती मुख्यंमंत्री तर निर्मल सिंह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बता दें कि - पीडीपी नेते मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांचे निधन झाल्याने पीडीपीने मेहबूबा मुफ्ती यांची पक्षनेतेपदी निवड केली आहे.

जम्मू- काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार महबूबा मुफ्ती
- निर्मल सिंह यांनी सांगितले की, राज्यात एकदा पुन्हा पीडीपी-भाजपचे सरकार प्रस्थापित होणार आहे.
- नव्या कॅबिनेटमधील नेते 4 एप्रिलला शपथ घेणार आहेत.
- पीडीपीने महबूबा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले आहे.
- महबूबा मुफ्ती या जम्मू- काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार
- दुसरीकडे, भाजपचे नेते निर्मल सिंह यांची उपमुख्‍यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, पीडीपी- भाजपमध्ये असे झाले डील