आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार : पोलिसाने केली मुलीच्या प्रियकराची क्रूर हत्या, डोळे फोडून घातल्या 5 गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना - बिहार पोलिसांच्या एका शिपायाने आपल्या मुलीच्या प्रियकराची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभय सिंह नावाच्या या शिपायाने आपली मुले आणि भावासह सहा जणांच्या मदतीने या 22 वर्षीय युवकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचे दोन्ही डोळे फोडले आणि नंतर पाच गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून अभय सिंह याच्यासह सुमारे डझनभर लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अभय सिंह यांचा मुलगा गोविंद आणि रोशन यांना अटक केली आहे. तर अभय नावाचा मुलगा फरार आहे.

मुलीचा जबाब - वडील, काका व भावांनी केली गत्या
अभय यांच्या मुलीने तिच्या जबाबामध्ये आपले वडील, काका आणि भावांनीच राहुलची हत्या केल्याचे सांगितले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभय बरोबर आपले प्रेम प्रकरण असल्याचेही तिने सांगितले. राहुल शुक्रवारी रात्री त्यांच्या घरी आला होता. त्याचवेळी कुटुंबीयांनी त्याची हत्या केली असे, तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, अभय यांच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचेही वृत्त आहे.
मृतदेहासाठीही भांडावे लागले
आयटीआय पास राहुलच्या हत्येची बातमी त्याचे वडील राकेश आणि नातेवाईक अनिल सिंह यांना रात्री 2 वाजेच्या सुमारास मिळाली. मुलाच्या हत्येची बातमी मिळताच. एसएसपी मनू महाराज यांना माहिती देण्यात आली. राहुलचे वडील नातेवाईकांबरोबर दौलतपूरला पोहोचले त्यावेळी राहुलला पोलिसांच्या जीपमध्ये टाकले जात अशल्याचे त्यांना दिसले. नातेवाईकांनी भांडण करून राहुलला ताब्यात घेतले आणि रुग्णालयात आणले. मात्र पोलिसांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. शनिवारी शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फोटो: प्रतिकात्‍मक वापरासाठी