आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसी : आबे-मोदींनी आरती केलेल्‍या ठिकाणी आता घाणच घाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीचा दौरा करून काहीच तास झाले. त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी वाराणसी जिल्‍हा प्रशासनाने दशाश्‍वमेधसह गंगा घाटाच्‍या रस्‍त्‍यांना फुलांनी सजवले होते. परंतु, आबे आणि मोदी येथून जाताच या ठिकाणी अवघ्‍या 24 तासांत परिस्‍थिती जैसे थे झाली असून, ठिकठिकाणी अस्‍वच्‍छता पसरल्‍याचे आमची सहयोगी वेबसाइट dainikbhaskar.com च्‍या टीमने केलेल्‍या पाहणीत आढळून आले.
घाटांवर अस्‍वच्‍छेतेचा डोंगर
- शिंजो आणि मोदी हे ज्‍या पाय-या उतरून गंगेची पूजा करण्‍यासाठी गेले होते त्‍या ठिकाणी आता लाकडी पाट्या खिळे खांचा खच पडलेला आहे.
- स्‍वागताचे सामान ठि‍कठिकाणी पडलेले आहे. त्‍यामुळे येथे येणा-या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिंजो आणि मोदी येथून गेल्‍यानंतर स्‍थानिक प्रशासनाने अस्‍वच्‍छेकडे दुर्लक्ष केले आहे.
पर्यटकांनी काय म्‍हटले ?
- या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्‍व पंतप्रधान मोदी करत आहेत. त्‍यामुळे येथील स्‍वच्‍छता इतरांसाठी प्रेरणास्‍त्रोत बनायला हवी, अशी भावना दिल्लीवरून आलेले पर्यटक रोहित माहेश्वरी यांनी व्‍यक्‍त केली.
- रोहित म्‍हणाले, ''दशाश्मेध घाटाची आजची अवस्‍था पाहून माझ्या मुलाने मला विचारले की, टीव्‍हीवर तर हा घाट सजलेला, स्‍वच्‍छ दिसत होता. आज सर्वत्र घाणच घाण आहे. ''
- ओडिसाचे मदन केल्ली म्‍हणाले, ''ज्‍या ठिकाणाहून दोन्‍ही देशांच्‍या पंतप्रधानांनी गंगाआरती पाहिली होती त्‍या ठिकाणी आज हार, फूल यांचा कचरा पडलेला आहे''.
- फ्रान्‍सच्‍या मेरीफुल म्‍हणाल्‍या, ''ज्‍या ठिकाणाहून पंतप्रधानांनी गंगाआरती केली ती जागा पाहण्‍यासाठी आम्‍ही आलो होते. मात्र, निराशा झाली''.
आयोजकांनी जबाबदारी झटकली
या बाबत आयोजकांची प्रतिक्रिया विचारली असता त्‍यांनी जबाबदारी झटकून टाकली. ते म्‍हणाले, ''कार्यक्रमांमुळे आमचे पदाधिकारी थकलेले आहेत तर दुसरीकडे अधिका-यांनी हे काम आयोजकांचे असल्‍याचे सांगितले''.
फोटो : ओपी मिश्रा
पुढील स्लाइड्सवर पाहा कशी पसरली घाण...