भारत विरुध्द पाक क्रिकेट सामना म्हणजे मैदानावर आणि मैदानाबाहेरही युध्दजन्य परिस्थिती असते. असाच एक प्रकार मेरठ विद्यापीठामध्ये घडला. पाकिस्तानी संघाला समर्थन दर्शविल्याने 67 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काही विद्यार्थी मेरठ विद्यापिठाच्या वसतीगृहातील टेलिव्हिजन संचावर भारत विरुध्द पाक हा सामना बघत होते. भारत पराभूत झाल्यानंतर काश्मिरच्या काही विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत भांडणही झाले. पाकिस्तानला समर्थन दर्शविणा-या 67 विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली आहे.
'सावधगिरीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचे' मेरठ विद्यापीठाचे कुलगुरु मंझूर अहमद यांनी सांगितले आहे.
'काश्मिरी विद्यार्थ्यांनी राष्ट्र-विरोधी भूमिका मांडल्याचे कारण पुढे करत त्यांच्यावर कारवाई केल्याचे वसतीगृहाचे व्यवस्थापकीय अधिकारी बन्सल यांनी सांगितले. परंतु पाकिस्तानच्या बाजुने घोषणाबाजी करणे म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्य केल्याचे म्हणता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यापिठातून काढून टाकण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जण घरीसुध्दा परतले आहेत.