आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी अध्यक्ष होताच आरसीए निलंबित, बीसीसीआयची तासाभरात कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांची राजस्थान क्रिकेट संघटनेच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवड झाल्याच्या तासाभरातच बीसीसीआयने अख्खी आरसीए निलंबित करून टाकली.
गेल्या 19 डिसेंबरला आरसीएच्या निवडणुका झाल्या होत्या. मात्र, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे त्याचा निकाल अद्याप जाहीर झाला नव्हता. न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी मुख्य पर्यवेक्षक एन.एम. कासलीवाल यांनी निवडणुकीचा निकाल घोषित केला. यात मोदींना 33 पैकी 24, तर प्रतिस्पर्धी रामपाल शर्मांना केवळ 5 मते मिळाली.
काय आहे प्रकरण
बीसीसीआयने सप्टेंबर 2013 मध्ये ललित मोदींवर तहहयात बंदी लादली. बोर्डानुसार अशी व्यक्ती राज्य संघटनेच्या सदस्य वा पदाधिकारीपदी राहू शकत नाही. यानंतरही मोदी नागौर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष होते. बोर्डाने त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र आरसीएने ते धुडकावले. मोदींनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवलीच. बोर्डाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.