आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमाला मंदिरातील तरुण महिलेची छायाचित्रे प्रसारित, एका उद्योजकाला विशेषाधिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - सबरीमाला मंदिरातील एका तरुण महिलेच्या छायाचित्रांमुळे सोशल मीडियात नव्या वादाला तोंड फुटले आहे. केरळ सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. सबरीमालाच्या अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे.
 
देवासवोम येथील मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांना यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. देवासवोम दक्षता आयोगाने याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून या छायाचित्रासंबंधी चौकशी सुरू केली आहे. १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश निषिद्ध आहे. अय्यप्पा हा आजन्म ब्रह्मचारी देव आहे. त्यामुळे या पर्वतीय मंदिरामध्ये अनेक भागात महिलांना प्रवेश नाही. यावरून पूर्वीही अनेक आंदोलने झाली आहेत.
 
एका विशेष व्हीआयपी व्यक्तीला दर्शनाची मुभा देण्यात आल्याची तक्रार मंत्र्याकडे आली होती. या उद्योजकाला विशेषाधिकार देण्यात आल्यानेदेखील मोठा वाद निर्माण झाला आहे.
 
उद्योजकासोबत महिला असल्याची तक्रार
कोल्लम येथील उद्योजकाला मंदिरात दर्शनाची विशेष सुविधा देण्यात आल्याची तक्रार आपल्याकडे आली आहे. या दिशेने आता चौकशी केली जाईल, असे कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी सांगितले. या उद्योजकासोबत एक महिलादेखील गर्भगृहात जाऊन दर्शन घेत असल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले. या महिलेचे वय प्रतिबंधित वयोगटातील असूनही ती येथे पूजा करते. संबंधित महिलेच्या मंदिरातील वावराला कोणीही आक्षेप घेत नाही. सुरेंद्रन यांनी अद्याप उद्योजकाचे नाव उघड केले नाही.
बातम्या आणखी आहेत...