आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंत्र्यांना हाकला, मायावतींचे अखिलेश यादव यांना आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी मुख्तार अन्सारी यांच्या प्रकरणात मंगळवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना थेट आव्हान दिले आहे. अन्सारी यांच्या पक्षाचे विलीनीकरण नंतरचा काडीमोड म्हणजे निव्वळ नाटक अाहे. त्यांना खरोखरच कायदा-सुव्यवस्थेची एवढी काळजी वाटत असल्यास त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सध्याच्या मंत्र्यांना काढून दाखवले पाहिजे, असे मायावतींनी म्हटले आहे.

अखिलेश यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या विरोधात फौजदारी खटले सुरू आहेत. असे असतानाही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना कायदा सुव्यवस्थेची खरीच चिंता असेल जनतेबद्दल ते संवेदनशील असतील तर त्यांनी पहिल्यांदा अशा मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा.

परिस्थितीअत्यंत वाईट : राज्यातील परिस्थितीअत्यंत वाईट बनली आहे. कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. पोलिसांनाही लक्ष्य केले जात आहे. अशा मुद्द्यांवर संवेदनशीलता दाखवण्याऐवजी सपचे सरकार जबाबदारी झटकू पाहत आहे. कायद्याचे संरक्षण करणाऱ्यांनाच लक्ष्य केले जात आहे.

सप भाजप यांच्या कारभारावर जनता नाराज आहे. राज्यातील गुन्हेगारी कमी झालेली नाही. केंद्रातील सरकारने निवडणुकीच्या अगोदर काळ्या पैशासह अनेक आश्वासने दिली होती, परंतु दोन वर्षांनंतरही त्याची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. बसपचे अगोदरचे काम चांगले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत जनतेसमोर बसप हाच उत्तम पर्याय आहे.
बातम्या आणखी आहेत...