आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लिप-लॉक\'मुळेही वादात सापडल्या होत्या वसुंधरा राजे, संघासोबतही वाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- 30 नोव्हेंबर 2006 ला दिल्लीत एका कार्यक्रमात वसुंधरा राजेंनी असा 'लिप-लॉक' केले होते.)
जयपूर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्याने वसुंधरा राजे यांची खूर्ची धोक्यात आली आहे. वसुंधरा राजेंविषयी सांगायचे झाल्यास हा वाद त्यांच्यासाठी नवा नाही. राजे यापूर्वीही अनेकदा या ना त्या कारणावरून अडचणीत सापडल्या होत्या.

शॉ यांच्यासोबत केलेल्या 'लिप-लॉक'ने आणले होते अडचणीत...
वसुंधरा राजे यांना सन 2006 मध्ये एका वादग्रस्त छायाचित्राने अडचणीत आणले होते. राजे यांच्या वादग्रस्त छायाचित्राची फक्त देशातच नव्हे तर विदेशातही चर्चा झाली होती.

29 नोव्हेंबर 2006 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या वसुंधरा राजे खादीला प्रमोट करण्‍यासाठी इंडिया इकॉनोमिक समिटला उपस्थित झाल्या होत्या. बायॉकोन कंपनीच्या प्रमुख किरण मजूमदार शॉ यांनी वसुंधरा राजे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघींनी लिप-लॉकही केले. नंतर मात्र, हे वादग्रस्त छायाचित्र चर्चेत आले होते. कॉंग्रेस नेत्यांनी यावर उलटसूलट चर्चा घडवून आणली. वसुंधरा राजे यांचे वर्तन भारतीय संस्कृतीसाठी अशोभनिय आहे. राजे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली होती.
आरएसएससोबत वाद...
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वसुंधरा राजे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) वादाची ठिणगी पडली होती. संघाचे नेते आणि पदाधिकार्‍यांना मुळात वसुंधरा राजेंचे वर्तन नापसंत आहे. अशा स्थितित संघ आणि राजे यांच्यातील अनेक वाद चव्हाट्यावरही आले. वसुंधरा राजे 2013 मध्ये दुसर्‍यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या. संघ कार्यालय 'भारती भवन' येथे त्या नियमित जात होत्या. परंतु, आरएसएस नेत्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. संघाच्या विचारांनी चालणारा भाजपच्या अन्य नेत्याला मुख्यमंत्रिपदाचे दायित्व देण्यात यावे, अशी संघ लॉबीची इच्छा होती.

वसुंधरा राजेंच्या मंदिरावरून वाद
राजस्थानच्या दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर जुलै 2014 मध्ये जोधपुर जिल्ह्यात बेरू गावात वसुंधरा राजे यांचे मंदिर बनवून देवी रुपात त्यांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. गावकर्‍यांनी या मंदिराला प्रचंड विरोध केला होता. पाहाता- पाहाता हे प्रकरण राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले होते. वसुंधरा राजे यांचे मंदिर हा विचार तर आरएसएसही चांगलाच खटकला होता.

मंदिराचे पुरोहीत हेमंत बोहरा यांनी राजकीय नेत्याचे दैविक अवतार पाहून गावकर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. बोहरा यांनी वसुंधरा राजे यांना अन्नपूर्णा देवीचे रुप दिले होते. एवढेच नव्हे तर एक रंगीत कॅलेंडर प्रसिद्ध करून त्यात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्‍ण अडवाणी, राजनाथसिंह यांना प्रत्येकी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तिच्या रुपात दाखवले होते. यानंतर मात्र, हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. वसुंधरा राजे यांच्या मंदिराला विरोध करत विश्नोई समाजाचे लोक रस्त्यावर उतरले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, वसुंधरा राजे आणि माधवराव सिंधिया यांच्यात सुरु होती वर्चस्वाची लढाई...