आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

918 किलोची खिचडी शिजवून भारताचा विश्वविक्रम; नागपुरातही शिजली ‘मनोहरी’ खिचडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ३ महिन्यांच्या तयारीनंतर सरकारची खिचडी शनिवारी तयार झाली. वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध शेफ व पद्मश्री संजीव कपूर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० खानसाम्यांनी ९१८ किलोची खिचडी शिजवली. त्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे. गिनीजमध्ये नोंद होण्यासाठी किमान ५०० किलोची खिचडी तयार होणे आवश्यक होते.

खिचडीसाठी स्टेनलेस स्टीलचे ३ थर असलेली ७ फूट रुंद व ३४३ किलो वजनी इन्सुलेटेड कढई तयार करण्यात आली होती. तांदूळ व डाळ अन्न प्रक्रिया मंत्रालयाने, मसाले टाटाने तर तूप पतंजलीने दिले. अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, बाबा रामदेव, भाजप खासदार साध्वी निरंजन ज्योती यांनी खिचडीला फोडणी दिली. गुरू पर्वाच्या निमित्ताने खिचडी अनाथ व गुरुद्वारातील ६० हजार जणांना वाटण्यात आली. 

भारतीय खिचडीचा सुगंध एक दिवस संपूर्ण जगात दरवळेल, अशी आशा बादल यांनी व्यक्त केली. रामदेव म्हणाले,  एक दिवस ती सुपर फूडची जागा घेईल.
 
- विशेष प्रकारच्या ७ फूट रुंद इन्सुलेट कढईत खिचडी
- अनाथ व गुरुद्वारात सुमारे ६० हजार जणांना वाटप
- बाबा रामदेव म्हणाले- खिचडी एक दिवस ‘सुपर फूड’ची जागा घेईल
 
अशी शिजली खिचडी
- ५०० किलो तांदूळ
- ३०० किलो डाळ वापरली
- १००  किलो गायीचे तूप
याशिवाय ज्वारी, बाजरी, भाज्या, मसाले व पाण्याचा वापर.
 
पुढे पाहा, संबंधित PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...