आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतंजलि हिंसाचार : CCTV फुटेजमध्ये रामदेव, भाऊ देत होता हल्ल्याची चिथावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिद्वार - उत्तराखंडमधील हरिद्वार येथील पतंजलि फूट अँड हर्बल पार्कमध्ये 27 मे रोजी झालेल्या हिंसक घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. त्यात रामदेव बाबा देखील दिसत आहेत. फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे, की रामदेव यांचे बंधू रामभरत जमावाला हल्ल्यासाठी चिथावणी देत होते. ते त्यांच्या सुरक्षा रक्षकांना हल्ला करण्यास सांगत आहेत. या हल्ल्यानंतर रामदेव यांच्या भावाला खूनाच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
पोलिस म्हणतात - सीसीटीव्ही फुटेजचा बराच भाग डिलीट
वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वीटी अग्रवाल म्हणाल्या, सीसीटीव्ही फुटेजचा बराच भाग डिलीट केला आहे. अग्रवाल म्हणाल्या, 'हल्ल्याच्या वेळी रामदेव आसपासच उभे होते. या फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की रामभरत त्याच्या सुरक्षा रक्षकांना यूनियन मेंबर्सवर हल्ला करण्याच्या सूचना देत आहे. मात्र या फुटेजचा बराचसा भाग डिलीट करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेमागे रामदेव यांचा हात आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.'

सर्च ऑपरेशनमध्ये घटनास्थळावर सापडल्या लाठ्या-काठ्या, तलवार आणि रिव्हॉल्व्हर
पतंजलि हर्बल फूड पार्कचे पोलिसांनी शुक्रवारी सर्च ऑपरेशन केले त्यात हर्बल पार्क परिसरात पाच रिव्हॉल्व्हर, मोठ्या संख्येने लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्र, दगड, हेल्मेट आणि लोखंडी रॉड सापडले. तसेच हर्बल पार्क कँपसमधून पोलिस वापरतात तसे अनेक जॅकेट जप्त करण्यात आले. एवढा शस्त्रसाठा आणि पोलिसांचे जॅकेट पार्कमध्य कसे याचे उत्तर पतंजलि प्रशासनाला देता आलेले नाही.
सर्च ऑपरेशनचे प्रमुख लष्कर बहादूरसिंह चौहाण यांनी सांगितले, की ट्रक यूनियनच्या हल्ल्याला उत्तर देता यावे यासाठी पार्क प्रशासनाने ही जमावा-जमव केलेली असावी. पोलिसांनी सांगितले, की घटनास्थळावरुन जेवढे शस्त्र जमा करण्यात आले त्यापैकी एकाचाही पार्क प्रशासनाकडे परवाना नाही. पार्कमध्ये तैनात 40 बाऊंसर या शस्त्रांचा वापर करत होते. विशेष म्हणजे हे सर्व बाऊंसर रामभरतचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
रामभरतला जामीन नाकारला
ज्यूडिशिअल मॅजिस्ट्रेट संदीप भंडारी यांच्या कोर्टात आरोपी रामभरत आणि त्याच्या सात सुरक्षा रक्षकांना शुक्रवारी हजर करण्यात आले. कोर्टाने या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शुक्रवारी रामभरतला भेटण्यासाठी त्याची आई, पत्नी आणि भाजप आमदार स्वामी यतीश्वरानंद जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते.
रामदेव - बालकृष्णवर कारावाईची मागणी
फुट पार्कमधील हिंसक घटनेनंतर काँग्रेसने रामदेव आणि बालकृष्णवर कारावाईची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुरुचरणसिंह बब्बर म्हणाले, 'रामदेव आणि बालकृष्ण यांच्यावरही खूनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निवदेन दिले जाईल. तरीही गुन्हा दाखल केला नाही तर कोर्टाचे दार ठोठवू.'

पुढील स्लाइडमध्ये घटनेशी संबंधीत छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...