आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'वेश्‍यावृत्ती\'पासून मुक्ती‍ मिळवण्यासाठी स्मशानभूमीत रात्रभर थिरकल्या वेश्या!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी- दररोजच्या अपमानीत जीवनापासून मुक्ती मिळवण्यासाठी वाराणसी येथे काही वेश्यांनी स्मशानभूमीत पेटत्या चितांसमोर रात्रभर नृत्य करून परमेश्वराकडे आराधना केली आहे. शहराच्या विविध भागात देहविक्री करण्यार्‍या महिला मोठ्यासंख्येने यात सहभागी झाल्या होत्या. सप्तमीला (बुधवारी) आपल्याला दु:खी जीवनापासून मुक्ती मिळावी म्हणून या वेश्यांनी रात्रभर नृत्य करून परमेश्वराला साकडं घातलं आहे.

पुढच्या जन्मात त्यांच्यावर देहविक्री करण्याची वेळ येऊ नये, म्हणून वाराणसीतील मणिकर्णिका स्मशानभूमीत बुधवारी रात्री वेश्यानी अखंड नृत्य साधना केली.

कार्यक्रमाचे आयोजक गुलशन कपूर यांनी सांगितले की, ही परंपरा अकबरच्या काळातील राजा मानसिंह यांनी सुरु केली होती. 16व्या शतकात राजा मानसिंह यांनी स्मशाननाथ मंदिर उभारले होते.