आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही देशातील सर्वात श्रीमंत सून; सांस्‍कृतिक, सामा‍जिक कार्यात असते अग्रेसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार (हरियाणा) - 1 नाव्‍हेंबरला हरियाणाचा स्‍थापना दिवस साजरा झाला. त्‍या अनुषंगाने आम्‍ही हरियाणच्‍या गौरवशाली इतिहास, संस्‍कृती, कला आणि विकासाबद्दल माहिती देणार आहोत. यामध्‍ये आज पहिल्‍या भागात सांगणार आहोत शालू जिंदल यांच्‍या विषयी. प्रसिद्ध उद्योगपती आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदल यांच्या त्‍या पत्नी आणि सर्वात श्रीमंत महिला आमदार सावित्री जिंदल यांच्‍या सून आहेत. मात्र, शालू यांची राज्‍यात ओळख आहे ती त्‍यांच्‍या कलाप्रेमामुळे. त्‍या चांगल्‍या नृत्‍यांगणा असून, सामाजिक कार्यतही अग्रेसर असतात.
नवीन जिंदल यांचा उल्‍लेखही काँग्रेसमध्‍ये सर्वाधिक श्रीमंत खासदार असाच होता. त्‍यांच्‍या यशामध्‍ये शालू यांचा मोलाचा वाटा आहे. वर्ष 2014 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत शालू यांनी आपल्‍या पतीचा प्रचार केला होता. पण, दुर्दैवाने मतदारांनी यावेळी त्‍यांच्‍या पतीला कौल दिला नाही. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबापैकी एक जिंदल कुटुंब आहे. शालू यांच्‍या सासू सावित्री जिंदल या जिंदल ग्रुपच्‍या प्रमुख आहेत. तसेच हिसार विधानसभा मतदार संघाच्‍या सदस्‍य आणि हरियाणा राज्य सरकारमध्‍ये कॅबिनेट मंत्री आहेत. 2005 पासून त्‍या आमदार आहेत. याच वर्षी त्‍या जिंदाल ग्रुपच्‍या प्रमुख झाल्‍यात. फोर्ब्सच्‍या अहवालानुसार त्‍या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. ऑक्‍टोबर 2013 मध्‍ये सावित्री जिंदल यांची एकूण संपत्‍ती 4.9 अब्‍ज डॉलर ( जवळपास 29858 कोटी रुपये) होती.
काळानुसार बदलणे आवडते
आयुष्‍य एकदाच मिळते. जी वेळ मिळते ती पुन्‍हा येत नाही. त्‍यामुळे काळानुसार बदला. वेळ वाया घालू नका, असा सल्‍ला शालू या देतात. शालू यांचे वैयक्तिक आयुष्‍यही खूप अॅक्टिव आहे. त्‍या सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. एवढेच नाही तर आपल्‍या पती आणि सासूच्‍या उद्योगतात हातभार लावतात.
300 कोटी रुपयांच्‍या संपत्‍तीचे मालक
जिंदल दाम्‍पत्‍य हे 300 कोटी रुपयांच्‍या संपत्‍तीचे मालक आहे. नवीन यांनी कुरुक्षेत्र लोकससभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्‍यावेळी त्‍यांनी आपली आणि आपल्‍या पत्‍नीची संपत्‍ती जाहीर केली होती. यात नवीन यांच्‍या नावावर जवळपास 288 कोटी रुपयांची संपत्‍ती शालू यांच्‍या नावावर 8 कोटी रुपयांची संपत्‍ती असलेल्‍याचे त्‍यांनी निवडणूक अर्जात म्‍हटले होते.
शालू आहेत उत्‍कृष्‍ट नृत्‍यांगणा
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्‍या शालू या उत्‍कृष्‍ट नृत्‍यांगणाही आहेत.सध्‍या त्‍या कुचिपुडी नृत्य शिकत आहेत. त्‍यांचे पती त्‍यांना यासाठी या कायम प्रोत्‍साहन देतात.
अनेक पुरस्‍काराने गौरव
शालू यांनी केलेल्‍या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्‍कारांनी त्‍यांचा गौरव झाला आहे. यात ‘एचटी सिटी दिल्ली मोस्ट स्टायलिश 2014’ अवॉर्ड, वुमन अचीवर्स अवॉर्ड ‘सीमापुरी टाइम्स’चा ‘इंडियन वुमन पावर अवार्ड’ अशा अनेक पुरस्‍काराने त्‍यांचा गौरव झाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा शालू यांचे फोटोज...