आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Couple Divorce Cancel After Advocate Advise In Rajasthan

अतूट नाते: काडीमोडच्या प्रयत्नात मनोमिलन, चुकांची झाली जाणीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगंगानगर- हिवाळ्याच्या सुटीनंतर श्रीगंगानगरमधील कौटुंबिक न्यायालय शनिवारी पहिल्यांदा उघडल्यानंतर एका नव्या कथेला सुरुवात झाली. घटस्फोटासाठी इथे आलेले एक जोडपे पुन्हा लग्नबंधनात अडकले. डबडबलेल्या डोळ्यांनी दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांना पुष्पहार घातले आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आणाभाका खाल्ल्या.

त्याचे झाले असे - पाच वर्षांपूर्वी संतराम आणि सुनीता यांचा विवाह झाला होता. चार वर्षांनंतर दोघांत भांडणे होऊ लागली आणि कुटुंबात तणाव वाढू लागला. परिणामी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. न्या. राजेंद्रकुमार शर्मा यांच्या न्यायालयात खटला सुनावणीसाठी आला. न्यायाधीशांनी सुरुवातीस पती-पत्नीमध्ये समुपदेशन केले. त्यात यश आले नाही तरीही न्यायाधीशांनी मन वळवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. संतराम यांचे वकील संजय धारीवाल आणि सुनीता यांचे वकील रजीराम वर्मा या दोघांवर समुपदेशनाची संयुक्त जबाबदारी सोपवण्यात आली. दोन्ही वकिलांनी संतराम आणि सुनीता यांना वारंवार समजावले.
दोघांच्या ज्या चुकांमुळे घटस्फोटाची स्थिती ओढवली त्याची त्यांनी जाणीव करून दिली. सततच्या भेटीगाठीमुळे संतराम आणि सुनीता यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. अॅड. धारीवाल म्हणाले, न्यायालयाच्या पुढाकारामुळेच या प्रकरणाचा शेवट सुखद झाला. पती-पत्नीने न्यायाधीशांसमोर एकत्र राहण्याचा निर्णय सांगितला.
कौटुंबिक न्यायालयात संतराम आणि सुनीता यांनी एकमेकांना पुष्पहार घातला आणि दोघेही नव्याने संसाराला लागले.