आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच फासावर असा झाला प्रेमाचा The End, चिठ्ठीत लिहून ठेवले होते हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक - येथे के सेक्टर 36 मधील सन सिटी फ्लॅटमध्ये बुधवारी संध्याकाळी एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही एकाच फासावर लटकलेले होते. येथून एक सुसाइड नोटही हस्तगत करण्यात आली आहे. यावर दोघांनी वेगवेगळा मजकूर लिहिलेला होता.

 

मुलाचे वडील म्हणाले- कोर्ट मॅरेज होते...
- सोनिपतच्या कालपाचे रहिवासी मुलाचे वडील शमशेर म्हणाले की, त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिल्लीत कोर्टात जाऊन लव्ह मॅरेज केले होते. मुलाने बोलण्यासाठी आम्हाला दोन वाजता बोलावले होते.
- त्यांना पोहोचायला उशीर झाला. ते संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचले तेव्हा दार आतून बंद होते. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. दार तोडल्यावर दोघेही फासावर लटकलेले आढळले.
- सूत्रांनुसार, मुलीच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. 

- पोलिसांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दाराला एक छिद्र झाले होते. त्यातून दोघांचेही पाय दिसले. त्यावरूनच अंदाज आला होता की, दोघांनी गळफास घेतला आहे.
- यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. आठ वाजता मुलीचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. मग पोलिसांनी दार तोडले. यानंतर एफएसएल एक्स्पर्ट डॉ. सरोज दहिया मलिक यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.

 

हे लिहिले होते सुसाइड नोटमध्ये...

 

रुचीने लिहिले होते-

आम्ही आमच्या मर्जीने जात आहोत. यात फॅमिलीचा काहीही संबंध नाहीये. आमच्यामुळे कुणालाच प्रॉब्लेम होऊ नये. आम्हीही कोणतीही चूक केली नव्हती. आम्ही घरच्यांशी बोललोत, पण ते आमच्या लग्नाशी सहमत नव्हते. म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. सॉरी मॉम!


संदीपने लिहिले होते- 
सॉरी पप्पा, आम्ही हे पाऊल उचलले. मला माहितीये की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. पण मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मी तुमच्यावरही प्रेम करतो. तुम्ही स्वत:ची आणि घरी सर्वांची काळजी घ्या. शेवटचा घरी गेलो होतो पप्पा. आम्ही दोघेही दोन्ही फॅमिलींची माफी मागतो.


पोलिसांनी कुटुंबीयांना सोपवला मतृदेह
- सिटी एसएचओ जगबीर सिंग म्हणाले की, पोस्टमॉर्टमनंतर कुटुंबीयांना मृतदेह सोपवण्यात आले आहेत. पोलिसांनी सुसाइड नोट व इतर सामान आपल्या ताब्यात ठेवले आहे. अजून कुठलीही तक्रार आलेली नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...