आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Couple Were Engage In Romance Suddenly Her Ex boy Friend Come

गार्डनमधील कपल्सचा रोमान्स जेव्हा मारहाणीत बदलतो, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड)- प्रेम सुरळीत सुरु असते तेव्हा सगळे आलबेल असते. पण त्यात मिठाचा खडा पडला तर सगळेच काही दुषित होते. अशीच काहीशी परिस्थिती झारखंडमध्ये अनुभवायला मिळाली. एका गार्डनमध्ये एक कपल छान रोमान्स करीत होते. सगळे काही सुरळीत सुरु होते. पण मध्येच तरुणीचा माजी प्रियकर येऊन धडकला. त्यानंतर दोघांत फिल्मीस्टाईल मारहाण झाली. तरुणीने चक्क हातात दगड घेतला. त्यानंतर मुलगा मात्र पळून गेला.
रांचीतील मोराबादी गार्डनमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास एक कपल बसले होते. दोघांमध्ये छान रोमान्स सुरु होता. यावेळी तरुणीचा माजी प्रियकर येथे आला. माजी प्रियसी एका दुसऱ्यासोबत बसलेली बघून तो संतप्त झाला. त्याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली. परिस्थितीचे गांभीर्य बघून विद्यमान बॉयफ्रेंडने तेथून पळ काढला. तरुणीला गार्डनमध्ये एकटेच सोडले.
त्यानंतर जे काही झाले तेही संतापजनक आहे. तरुणीचा पारा चढला. तिने माजी प्रियकराला मारहाण करण्यास सुरवात केली. जवळपास दीड तास हे नाट्य सुरु होते. त्यानंतर त्यानेही तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण ही तरुणी त्याला काही जाऊ देईना. तिने त्याची बाईक पकडून ठेवली होती. त्यानंतर गार्डनमधील इतरांनी तिला समजावले. त्याला जाऊ द्यावे, असे सांगितले. अखेर तिने माजी प्रियकराला जाऊ दिले. आणि या नाट्यावर अखेर पडदा पडला.
या संपूर्ण घटनेचे फोटो बघा पुढील स्लाईडवर...
फोटो- संतोष चौधरी/दैनिक भास्कर न्युज नेटवर्क