चित्रपटगृह, मिनिरल वॉटर अशा विविध मार्गांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री
जयललिता त्यांचे ब्रँडींग करत असल्याचे आपण याआधीही अनेकदा पाहिले आहे. त्यांच्या नावाचे अनेक प्रोडक्ट्स तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतात. एवढंच काय तर पूर येऊन गेल्यानंतर पूरग्रस्तांना पाठवण्यात आलेल्या मदत साहित्यावरही अम्माचे फोटो होते. त्यामुळे अम्मांवर अनेकदा टीकाही होत असते. पण या टीकांना अम्मा म्हणजेच जयललिता गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते. कारण पुन्हा एकदा एका वेगळ्या स्टाइलमध्ये अम्मांचे ब्रँडींग केल्याचे समोर आले आहे. यावेळी सामुहिक विवाह सोहळ्यातील नवरा नवरींच्या बाशिंगावर अम्मांचा फोटो पाहायला मिळाला.
कोइम्बतूरमध्ये नुकतेच एक सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एआयएडीएमके पक्षाच्या वतीने जयललिता यांच्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यामध्ये सुमारे 200 हून अधिक जोडप्यांचा विवाह झाला. या विवाह सोहळ्यामध्ये नवरा नवरीच्या डोक्यावर जे बाशिंग होते त्यावर मुख्यमंत्री दयललिता यांचा फोटो लावलेला होता.
या सामुहिक विवाह सोहळ्याला जयललिता स्वतः उपस्थित नव्हत्या. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावरील फोटोच्या माध्यमातून प्रत्येक दाम्पत्यापर्यंत अम्माचा संदेश पोहोचवला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS