किशनगड/आजमेर (राजस्थान) - जयपूर- भोपाल इंटरसिटी ट्रेनचा मोठा अपघात बुधवारी टळला. आज सकाळी साडे सात वाजता भोपाळहून जयपूरकडे निघालेल्या रेल्वेच्या दोन कोचला जोडणारी कपलिंग तुटली यामुळे दहा डबे इंजिनसह पुढे गेले तर बारा डबे मागे राहिले. एकही डबा रुळांवरुन उतरला नाही त्यामुळे मोठा अपघात टळला. मात्र कपलिंग तुटल्यामुळे रेल्वे अडीच तास लेट झाली.
बुधवारी रेल्वेने किशनगड रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर जवळपास 100 मीटरवर रेल्वेला जोरदार झटका बसला आणि दोन कोचमधील कपलिंग तुटल्याच्या लक्षात आले. मोटरमनने समयसुचकता दाखवत रेल्वे हळूहळू थांबवली त्यामुळे मागून आलेल्या डब्यांचाही वेग कमी झाला आणि ते थोड्या अंतरावर सुरक्षीत थांबले.
22 डब्यांची रेल्वे
भोपाळ - जयपूर इंटरसिटी ट्रेनला एक इंजिन आणि 22 डबे होते. कपलिंग तुटल्याने 12 डबे मागे राहिले होते. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा घटनेचे संबंधीत फोटोज्...