आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्ट’वर कर्नाटकात टाकली अघोषित बंदी, कानडी संघटनांचा थिएटर मालकांवर दबाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - कर्नाटकातभाषेवरून सुरू असलेल्या वादाचा फटका मराठी चित्रपटांना बसत आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "सर्वोत्कृष्ट चित्रपट' ठरलेला आणि देश-विदेशातील एकूण १७ पुरस्कार पटकावणारा "कोर्ट' या मराठी चित्रपटाला शेजारच्या कर्नाटक राज्यात मात्र अघोषित बंदीचा सामना करावा लागत आहे. कानडी संघटनांच्या दबावापोटी संपूर्ण कर्नाटकात एकही मल्टिप्लेक्स अथवा थिएटर मालक हा मराठी चित्रपट दाखवायला तयार नसल्याचे चित्र आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. परंतु, येथील मराठीजनांना नजीकच्या काळात एकही लोकप्रिय मराठी सिनेमा पाहता आलेला नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे मराठी सिनेमांना या राज्यात अघोषित बंदीचा सामना करावा लागत आहे. "कोर्ट' सिनेमाचा विषय आक्षेपार्ह नसला तरी हा सिनेमा केवळ मराठी भाषेत असल्यामुळे कर्नाटकात कुठेही प्रदर्शित करण्यात आला नाही. "मराठी सिनेमा दाखवून आम्ही संकट ओढवून घेणार नाही. आम्ही मराठी सिनेमा दाखवला तर कन्नड भाषिक संघटना विरोध करणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बंगळुरूमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. शहरात निरर्थक तणाव उत्पन्न करण्याचा आमचा इरादा नाही.' अशी प्रतिक्रिया बंगळुरूतील एका थिएटर मालकाने दिली. बेळगाव परिसरात मराठी भाषिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.