आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पदवी प्रकरणी स्मृती इराणींना न्यायालयाचा दिलासा, याचिका फेटाळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बनावट पदवी प्रकरणात पतियाळा न्यायालयाने निवडणूक आयाेगाला कथितरीत्या चुकीची माहिती दिल्याबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पाचारण न करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने विलंबाचे कारण देत इराणींविरुद्धची याचिका फेटाळली.
इराणींविरुद्ध दाखल याचिकेत म्हटले होते की, त्यांनी निवडणूक आयोगाला शैक्षणिक पात्रतेबाबत खोटी माहिती दिली. स्मृती यांनी विविध निवडणुका लढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात पदवीबाबत खोटी माहिती दिली.

महानगर दंडाधिकारी हरविंदर सिंह यांनी गेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्ते लेखक अहमर खान यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला. मंगळवारच्या सुनावणीवेळी त्यांनी इराणी यांना समन्स पाठवण्यास नकार दिला. न्यायालय म्हणाले, मूळ कागदपत्रे काळानुरूप हरवले आहेत आणि उपलब्ध दस्तऐवज मंत्र्याला समन्स पाठवण्यास पुरेसे नाहीत. न्यायालयाने यासाठी याचिकाकर्त्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तक्रार करण्यास ११ वर्षे लागली याचा अर्थ मंत्र्यांना त्रास देण्यासाठीच तक्रार केल्याचे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली.
बातम्या आणखी आहेत...