आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रद्युम्न मर्डर: कंडक्टरची पत्नी म्हणाली- गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांना नशाही देण्यात आला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम (गुडगाव) - प्रद्युम्न मर्डर केसमध्ये आरोपी बस कंडक्टर अशोक कुमार बुधवारी संध्याकाळी 7 वाजता तुरुंगातून मुक्त झाला. मंगळवारी अॅडिशनल अँड सेशन्स जज रजनी यादव यांच्या कोर्टाने अशोकला 50 हजार रुपयांच्या अनामत रकमेवर जामीन दिला. आपल्या गावी पोहोचताच अशोकने DivyaMarathi.Com शी बातचीत केली. तो म्हणाला- रिमांडदरम्यान पोलिसांनी मला खूप टॉर्चर केले होते. यामुळेच मी गुन्हा कबूल केला होता. अशोकचा नातेवाईक ओ. पी. चोपडा म्हणाला की, अशोकला ताप आहे. त्याला डॉक्टरांकडे न्यायचे आहे.

 

दीड महिन्यापासून बेडशीट दिली नव्हती, त्यांना वाटले त्यानेच फाशी घेईन
- अशोक म्हणाला- मी मागच्या दोन महिन्यांपासून जेलमध्ये होतो. पण दीड महिन्यापर्यंत मला झोपण्यासाठी बेडशीटही दिलेली नव्हती. त्यांना वाटायचे मी यानेच फाशी घेईन. मी जेलमध्ये दोन महिन्यांपासून टीव्ही पाहिला नाही, म्हणून या प्रकरणावर बाहेर काय सुरू होते.
-दुसरीकडे अशोकची पत्नी म्हणाली की, पोलिसांनी त्याला मारले, उलटे लटकावले, त्याचा छळ केला. गुन्हा कबूल करण्यासाठी खूप टॉर्चर केले. त्यांना नशाही देण्यात आला."

 

मीडियाला टाळण्यासाठी दुसऱ्या गेटमधून बाहेर काढले
- अशोकच्या सुटकेच्या प्रतीक्षेत भोंडसी जेलच्या बाहेर मोठ्या संख्येने मीडिया प्रतीक्षा करत होता. तुरुंग प्रशासनाने त्याला जेलच्या दुसऱ्या गेटमधून बाहेर काढले. गावी पोहोचून अशोकने त्याच्या मामाचे आभार मानले.
- दुसरीकडे, मीडियालाही थँक्स म्हटले. तो म्हणाला की, आता तपास योग्य दिशेने होत आहे.
- शेजारी महेश म्हणाला की, तो गावात पोहोचला आहे. सध्या त्याला त्याच्या नातेवाइकाच्या घरी थांबवण्यात आले आहे. ते घर त्याच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...