आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Not Giving The Permission Of Adopted Second Child

दुसऱ्या मुलीची आई होण्यात न्यायालयाची आडकाठी,अविवाहित महिला अधिकाऱ्याची कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - त्या पहिल्या प्रयत्नातच एक मुलीच्या आई झाल्या होत्या. मुलगी लहानची मोठी होत चौथीत गेली होती. शाळेत वर्गमित्र मैत्रिणींकडून भावा-बहिणीतील गमती जमती तिला कळू लागल्या आणि वाटले मलाही भाऊ किंवा बहीण असती तर? मुलीला एकटेपणा जाणवत असल्याची जाणीव आईला झाली. त्यामुळे तिने पुन्हा आई होण्याचा निर्णय घेतला. या वेळीही त्यांना एका मुलीस दत्तक घेऊन आई व्हायचे होते. मात्र, न्यायालयाने तसे करण्यापासून रोखले.

आधीची एक मुलगी आहे, त्यामुळे दुसऱ्या मुलीची आई होऊ शकत नाही. कायदा त्यास परवानगी देत नसल्याचे सांगत न्यायालयाने त्यांना रोखले. उदयपूरमधील अकाउंटंट अधिकारी ममता(बदललेले नाव) अविवाहित आहेत, परंतु त्या दोन मुलींच्या आई आहेत. त्यांनी दोघींना अनाथाश्रमातून दत्तक घेतले आहे. २००५ मध्ये पहिली तर दुसरीला आठ महिन्यांपूर्वी दत्तक घेतले. पहिल्या मुलीच्या वेळी अडचणी आल्या नाहीत. सव्वा वर्षाच्या दुसऱ्या कन्येशीही त्यांचे भावनिक नाते जडले आहे. लहान मुलगी मोठीचे पाहून आईला "मम्मा' म्हणून हाक मारू लागली आहे. मात्र, न्यायालयाची त्यास मान्यता नाही. ममता यांनी दत्तक आईचा दर्जा प्राप्त करण्यासाठी उदयपूर सत्र न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. हिंदू दत्तक व पालनपोषण कायद्याच्या कलम ११ चा त्यासाठी आधार दिला. या कलमाअंतर्गत पालकास दोन मुलगे किंवा दोन मुलींना दत्तक घेता येत नाही.

सुश्मिता सेन यांनाही अडचणी
माजी विश्वसुंदरी सुश्मिता सेनला दोन मुलींना दत्तक घेण्यात अडचणी आल्या होत्या. वरिष्ठ न्यायालयाने तिला दुसरी मुलगी दत्तक घेण्याची परवानगी दिली होती.