आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री आेमान चंडींविरुद्ध एफआयआरचे कोर्टाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तिरुवनंतपुरम केरळचे मुख्यमंत्री चंडी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गुरुवारी ऑल इंडिया फेडरेशनचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.)
त्रिवेंद्रम- केरळच्यासौरऊर्जा घोटाळ्यात बुधवारी दक्षता न्यायालयाने मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर विरोधी पक्षांनी चंडींविरुद्धचे आंदोलन आणखी तीव्र करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

त्रिशूरचे तपास आयुक्त आणि विशेष न्यायमूर्ती (दक्षता) एस. एस. वासन यांनी ऊर्जामंत्री आर्यदन मोहंमद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यासोबत दक्षता संचालकांनाही लवकरात लवकर चौकशी पूर्ण करण्यास सांगितले. विशेष न्यायमूर्तींनी पी. डी. जोसेफ यांच्या खासगी याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे आदेश दिले. जोसेफ यांनी पुरावा म्हणून सरिताच्या जबाबाची सीडी आणि वृत्तपत्रातील कात्रणे याचिकेसोबत जोडली. या घोटाळ्याची चौकशी करणारे न्या. शिवाराजन आयोगासमोर सरिता यांनी मंगळवारी जबाब नोंदवला. त्यानुसार "टीम सोल कंपनी'च्या बाजूने निकाल देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या एका निकटवर्तीयास १.९० कोटी रुपये दिले. ऊर्जामंत्र्यांनाही ४० लाख रुपयांची लाच दिली.
मुख्यमंत्री चंडी यांचे कोझिकोड रेल्वेस्थानकावर आगमन होताच डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. कार्यकर्त्यांनी चंडी यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना पेपर स्प्रेचा मारा करावा लागला.

"आम्हीराज्यात ७०० पेक्षा जास्त बार बंद केले. या बारमालकांच्या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पराभव झाला. अशा स्थितीत माझ्यावर लावण्यात आलेले आरोप माकपा आणि काही बारमालकांच्या राजकीय कटाचा भाग आहे.'' - ओमान चंडी, मुख्यमंत्री,केरळ

"चंडी यांनीखुर्ची सोडावी. त्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही. अन्यथा आंदोलन करू .'' - व्ही. एस. अच्युतानंद, माकपानेते
तपशील उघड करण्यासाठी आईला सीएमचा फोन : सरिथा
मुख्यमंत्रीओमान चंडी यांच्याविरुद्ध हल्ल्याची धार कमी करता या प्रकरणातील मुख्य आरोपी सरिथा एस. नायरने गुरुवारी म्हटले की, घोटाळ्यासंदर्भात २०१३ मध्ये तुरुंगात असताना मी त्यातील वस्तुस्थिती उघड करू नये यासाठी चंडी यांनी आईला फोन करून माझे मन वळवण्यास सांगितले होते. त्याआधी बुधवारी सरिथाने चंडींच्या निकटवर्तीयाला १.९० कोटी ऊर्जामंत्री मोहंमद यांना ४० लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला. सरिथा आणि तिचा सहआरोपी बिजू राधाकृष्णन यांनी सोलार पॅनल साेल्युशन देऊ करत अनेक लोकांची फसवणूक केली आणि त्यांना कोट्यवधी रुपयांना गंडवले. सरिथा यांना नऊ महिन्यांनंतर जामीन मिळाला, तर राधाकृष्णन अद्याप तुरुंगात आहे.