आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियकराच्या मदतीने माता-पित्यासह सात जणांचे केले होते तुकडे, दोघांचेही निघाले डेथ वॉरंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरोही (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील अमरोही जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या करण्याच्या आरोपात स्थानिक कोर्टाने डेथ वॉरंट जारी केले आहे. दोषी ठरविण्यात आलेल्या प्रेमीयुगुलाला फासावर लटकवण्यासाठी वरिष्ठ तुरुंग अधिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. शबनमने प्रियकर सलीमच्या मदतीने 2008 मध्ये आई-वडीलांसह घरातील सात जणांचे कुऱ्हाडीने तुकडे केले होते. हे दोघेही सध्या अमरोही जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत.
काय आहे प्रकरण
अमरोही जिल्ह्यातील हसनपूर गावालगतच्या बावनखडी येथे 2008 च्या 14/15 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. मध्य रात्रीनंतर घरात झोपलेल्या सात जणांवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. हत्येचा आरोप शिक्षामित्र शबनमवर ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनूसार, शबनमने प्रियकराच्या मदतीने वडील शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस व राशिद, वहिणी अंजूम, सात महिन्याचा भाचा अर्श आणि आतेबहिण राबिया यांचे कुऱ्हाडीने तुकडे केले होते.
सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली शिक्षा
15 जुलै 2010 रोजी अमरोहीचे तत्कालिन जिल्हा न्यायधीश ए.ए. हुसैनी यांनी शबनम आणि सलीमला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. तिथे जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. आरोपींनी सुप्रीम कोर्टात अपील केले. 15 मे रोजी सुप्रीम कोर्टानेही त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. गुरुवारी अमरोहीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. पाठक यांनी दोघांचे डेथ वॉरंट जारी केले. या दोघांनी राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केलेली नाही.
डेथ वॉरंट पाहून शबनमला कोसळले रडू
अमरोही तुरुंग अधिकाऱ्यांना गुरुवारी रात्री आठ वाजता डेथ वॉरंट मिळाले. त्यानंतर त्यांनी शबनमला बोलावून तिला ते वाचण्यास दिले आणि त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. डेथ वॉरंट हातात घेतल्यानंतर शबनमला रडू कोसळले आणि ती तिथेच खाली बसली. तिने रात्री जेवणही केले नाही. अधिकाऱ्यांनी तिला सांगितले, की अजून फाशीची तारीख निश्चित झालेली नाही. तुम्हा दोघांकडे अजून दया याचिका दाखल करण्याचा पर्याय शिल्लक आहे.