आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराक ओबामांविरुद्धची याचिका कोर्टाने फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - आपल्या वक्तव्यात भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून दाखल अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविरुद्धची याचिका स्थानिक न्यायालयाने फेटाळली आहे. अॅड. सुशील कुमार मिश्रा यांनी याचिका दाखल केली होती. भारतीय दंड संहिता कलम ५०० अंतर्गत त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.
न्याय दंडाधिकारी नीलिमा सिंग यांनी मंगळवारी याचिका फेटाळली. त्याआधी दंडाधिका-यांनी सोमवारी सुनावणी १८ फेब्रुवारीला ठेवली होती. मात्र, राष्ट्राध्यक्षांना राजनैतिक कवच असल्यामुळे प्रकरण सुनावणी योग्य नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. धार्मिक असहिष्णुतेमुळे भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा कलंकित होण्याचा इशारा ओबामा यांनी आपल्या भाषणात दिला होता.