आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Sentensed Hang Till Death To Criminal Anbah Near Gwalior In Acid Attack Case

ऐतिहासिक निर्णय : अँसिड टाकून तरुणीची हत्या करणार्‍यास फाशीची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाह (मुरैना) - मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील एका न्यायालयाने अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. अँसिड हल्ल्यात एखाद्या आरोपीला फाशीसारखी कठोर शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

ही घटना मुरैना जिल्ह्यातील पोरसा गावातील आहे. येथे 20 जुलै रोजी योगेंद्र याने एकतर्फी प्रेमातून रूबी या महिलेवर अ‍ॅसिड फेकून तिची हत्या केली होती. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. सी. गुप्ता यांनी योगेंद्रवर कलम 302, कलम 450 व कलम 326 (क) अंतर्गत दोषी ठरवले. कोर्ट म्हणाले की, सोबत राहण्यास नकार दिल्याने युवकाने महिलेच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकले. ही व्यक्ती भविष्यात त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर कुणालाही मारू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी जन्मठेपेची शिक्षा पुरेसी नाही. आरोपीचे कृत्य अतिदुर्मिळ प्रकारात मोडणारे आहे. रुबीचा पती संजू गुप्ता याने निकालानंतर सांगितले की, न्यायालयाच्या निकालावर मी समाधानी आहे. आता कुणी व्यक्ती एखाद्या महिलेवर अ‍ॅसिड फेकण्याचे धाडस करणार नाही.
एकतर्फी प्रेमातून केला होता हल्ला
आरोपी योगेंद्र रुबीवर एकतर्फी प्रेम करत होता. रुबीने पोरसा येथील व्यापारी संजू गुप्तासोबत न्यायालयात विवाह केला होता. जुलै 2013 मध्येती माहेरी आली होती. 20 जुलै रोजी ती आजी व कुटुंबीयांसोबत झोपलेली असताना योगेंद्रने घरात घुसून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. त्यात दुसर्‍या दिवशी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी फरार योगेंद्रला 11 सप्टेंबर रोजी अटक केली. तो साधूच्या वेशात राहत होता.
फोटो - आरोपी योगेंद्र
पुढील स्लाइडवर पाहा मृत रुबीचा फोटो...