आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्टाने मागवला खुलासा, उत्तराखंडमधील प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून - उत्तराखंड उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष गोविंदसिंह कुंजवाल यांना अपात्र आमदार प्रकरणी प्रति-शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे. काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यात आले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायमूर्ती यू.सी.ध्यानी यांनी विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भात आदेश दिले. १८ एप्रिल रोजी हे शपथपत्र दाखल करावयाचे आहे. फिर्यादी पक्षाला त्यावर आपण म्हणणे २२ एप्रिलपर्यंत मांडता येईल. २३ एप्रिल रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या आमदारांनी या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. बंडखोर आमदारांची बाजू साकेत बहुगुणा मांडत आहेत. या दरम्यान संबंधित आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेच तर ते न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी करू शकतील, असेही न्या. ध्यानी म्हणाले. या आमदारांना अपात्र ठरवणे योग्य असल्याचा युक्तिवाद विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील वकील कपिल सिब्बल यांनी केला.

या बंडखोर काँग्रेस आमदारांनी उघड उघड भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ते अपात्र असल्याचे सिब्बल म्हणाले. त्यांनी भाजप आमदारांसोबत राजभवनाचा प्रवास केला. त्यानंतर चार्टर विमानाने दिल्लीचा प्रवासही केल्याचे सिब्बल म्हणाले. याउलट आपण पार्टीतून बंडखोरी करण्यासारखे आपण काहीच न केल्याचे फिर्यादींनी म्हटले आहे. २७ मार्च रोजी कुंजवाल यांनी ९ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यापैकी ६ आमदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.