आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : सिवानमध्ये प्रतिष्ठित व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिवान- बिहारमधील सिवान जिल्ह्यात असलेल्या महापूर गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास राशीद अहमद सरकार या व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर संतप्त जमावाने बुधवारी सकाळी हुसेनगंज भागात अनेक ठिकाणी आग लावली.  तसेच रास्ता रोकोही करण्यात आला.  

घटनास्थळी आलेल्या पोलिसांनाही लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. संतप्त जमावाने मुफस्सिल पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध प्रसाद यांचे वाहन आणि हुसेनगंज पोलिस ठाण्याची जीप जाळली. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून ६ पोलिस ठाण्यांतील पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच सिवानचे जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार घटनास्थळी दाखल झाले. राशीद अहमद प्रतिष्ठित व्यापारी होते. 
बातम्या आणखी आहेत...