आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायींसाठी \'कब्रस्तान\' ठरत आहे ही गोशाळा, गाडल्या जात आहे जिवंत गायी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोशाळेत मृत गायींचा खच पडत आहे. - Divya Marathi
गोशाळेत मृत गायींचा खच पडत आहे.
जयपूर - पावसाने जयपूर मेट्रो सिटीचा मेकअप धुवून टाकला आहे. पावसाने उघडे पाडलेले जयपुरचे रुप भयावह आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर लोकांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे तो शहरातील हिंगोनिया गोशाळेतील गायींच्या समस्येपेक्षा वेगळा नाही. हिंगोनिया गोशाळेत झालेल्या दलदलीत फसून रोज जिवंत गायी गाडल्या जात आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये येथे 200 गायींनी प्राण सोडला आहे.

गायींच्या मृत्यूचे काय आहे कारण
- येथून दररोज 65 ट्रॉली शेण रोज काढले जाते. दोन महिन्यांपासून येथून शेण उचलण्यात आलेले नाही.
- या शेणाचा उग्रदर्प ही घाण झाकण्यासाठी पालिकेने वरवरचे उपाय केले आणि त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी आणखी वाढली आहे.
- पालिकेने शेण झाकण्यासाठी त्यावर माती टाकली, त्यानंत आलेल्या पावसामुळे ही माती आणि शेण यांची दलदल येथे झाली आहे. या दलदलीत फसून गायींचा प्राण जात आहे.
- हायकोर्टाच्या आदेशाने या गोशाळेचे बांधकाम झाले. त्यात गायींसाठी गोठे आणि पक्के शेड्स बांधण्यात आले. मात्र हे काम करत असताना पाणी बाहेर काढण्याची कोणतीही व्यवस्था ठेवण्यात आली नाही.
- यामुळे गोशाळेसोबतच रस्त्यावरील पाणीही गोठ्यात साचले आणि समस्येत भर पडत गेली.
- अनेक गोसेवक समित्यांनी हिंगोनिया गोशाळेच्या देखभालीसाठी परवानगी मागितली. मात्र पालिकेने त्यांना परवानगी नाकारली आहे.

आकडे काय सांगतात
- दर महिन्याला 1200 गायींचा मृत्यू. दररोज 40 गायी मरत आहेत.
- प्रत्येक गोठ्यात 5 फुटांपर्यंत दलदल झाली. दररोज 40 गायी आयसीयूमध्ये दाखल होत आहे.
- येथे 60 कर्मचारी कामावर आहेत. 199 कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गोशाळेचे झालेले हाल...
बातम्या आणखी आहेत...