आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क गायीला पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - येथे एका गायीला पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेचे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहे. या हाॅलतिकिटावर गायीचा फोटो देखील आहे हे विशेष. बोर्ड ऑफ प्रोफेशनल एंट्रन्स एक्झामिनेशनतर्फे (बीओपीईई) जारी करण्यात आलेल्या या हॉलतिकीटावर गायीचे नाव काचिर असे नोंदवण्यात आले आहे. ही गाय गुरा दंड नावाच्या वळूची मुलगी असल्याचा उल्लेख आहे.

हे प्रकरण काश्मीर विधानसभेत विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ता जुनैद आजिम मट्टू यांनी टि्वटरवर हॉलतिकीटच्या फोटो कॉपी अपलोड केल्यानंतर चर्चेतत आले. या फोटोसोबत आपल्या अकाउंटवर मट्टू यांनी लिहिले होते की, माझयाकडे कुमारी काचिर गावाला मिळालेले प्रोव्हिजनल कन्फर्मेशन पेजसोबत बीओपीईईने जारी केलेल्या रकमेचे डिटेल्सदेखील आहेत. मट्टूंचा दावा आहे की, राज्य सरकारच्या अादेशानंतरच हे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. प्रवेशपत्राची कॉपी बीओपीईईच्या वेबसाइटवरूनच काढण्यात आली आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर बीओपीईईला प्रवेशपत्राशी संबंधित रेकॉर्ड हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री नईम अख्तर यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी करताना मट्टू यांनी नईम अख्तर यातून स्पष्ट करू इच्छितात की त्यांच्या कार्यकाळात शिक्षणाचे नवे मापदंड निर्माण होतील. इतर नेत्यांनीही या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करत तीव्र नाराजी प्रकट केली आहे.

कुणी तरी चेष्टा केली असेल
बीओपीईईचे परीक्षा संचालक फारूक अहमद मीर यांनी म्हटले की, अधिकारी अशा प्रकारची गंभीर चूक करू शकत नाहीत. त्यांच्या नावावर कुणी तरी चेष्ट केली असेल. पण त्यांनाही आम्ही शिक्षा करू शकत नाही. अर्जांचे सर्व काम ऑनलाइन होते. छायाचित्र ओळखणारे सॉफ्टवेअर मनुष्य व प्राण्यातील फरक ओळखू शकत नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन कुणी तरी हा खोडसाळपणा केला आहे.