आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cow Milk Party: Prominent Muslim Leader Appeals To Community Not To Consume Beef

काऊ मिल्क पार्टी; गोमांस सेवन न करण्याचा धर्मगुरूंचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- गोमांसावरून देशभरात सुरू असलेल्या वादविवादादरम्यान शनिवारी येथील मुस्लिम धर्मगुरूंनी गोमांस न खाण्याचे आवाहन करतानाच "काऊ मिल्क पार्टी' साजरी केली. यात सहभागी मुस्लिम धर्मगुरू व नागरिकांनी गायीचे दूध प्यायले व ते लोकांना वाटले देखील. या पार्टीच्या माध्यमातून सामाजिक सद्भावनेचा तसेच बंधुभावाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात सुन्नी धर्मगुरू मौलाना खालिद रशीद फरंगी महली व सीडीआर आयचे माजी अध्यक्ष डॉ. नित्यानंद उपस्थित होते.

हजरतगंज येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना फरंगी म्हणाले, या कार्यक्रमामुळे जगात चांगला संदेश देईल. कारण लखनऊमध्ये एखादी गोष्ट सुरू होते तेव्हा ती दूरपर्यंत जाते. आपण देशाला डिजिटल इंडिया व आर्थिक महाशक्ती बनवण्याचे स्वप्न पाहत आहोत. त्यामुळे अशा वादग्रस्त घटनांपासून दूर राहिले पाहिजे. जेव्हा कधी देशात दंगली झाल्या, अयोध्येतील घटना झाली त्या वेळीदेखील लखनऊ शांतच होते. माझी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की, त्यांनी गायीचे मांस भक्षण करू नये.

गोमांस अजिबात योग्य नाही. पैगंबर - ए-इस्लामनेही हेच सांगितले आहे की, गायीचे दूध व तूप औषधासमान आहे. याउलट गोमांस आजार वाढवणारे आहे. आपल्याला एकमेकांच्या आस्थेची जाण ठेवावी लागेल. तरच एकोपा टिकून राहील.