आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये 2 तासांत 2 मर्डर, पहिले CPM नंतर BJP कार्यकर्त्याची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
CPM कार्यकर्त्यांची घरात घुसून हत्या करण्यात आली. (प्रतिकात्मक फोटो) - Divya Marathi
CPM कार्यकर्त्यांची घरात घुसून हत्या करण्यात आली. (प्रतिकात्मक फोटो)
तिरुअनंतपूरम - केरळमधील कन्नूर जिल्ह्यात 2 तासांमध्ये सीपीएम आणि भाजपच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. निवडणुकीनंतर येथील रक्तरंजित राजकारण संपेल असे बोलले जात होते, मात्र व्हायलन्स पॉलिटिक्सने पुन्हा तोंड वर काढले आहे.

असे झाले मर्डर
> पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 10 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सी.व्ही.धनराज (36) यांची पय्यानूर जवळ अज्ञात गँगने हत्या केली.
> बाइकवर आलेल्या गँगस्टर्सनी धनराज यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली.
> हल्लेखोर तीन बाइकवर आले होते. हल्ल्यानंतर धनराज यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
> या हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप सीपीएमने केला आहे.
> घटनेनंतर दोन तासांमध्येच पय्यानुरमध्ये भाजप समर्थक संघटनेचे नेते सी.के. रामचंद्रन (46) यांची त्यांच्या राहात्या घरात हत्या करण्यात आली.
> आरोपींनी रामचंद्रन यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी बॉम्बस्फोट केला होता. रामचंद्रन यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित केले गेले.
> रामचंद्रन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संघटना भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते होते.

पय्यनुरमध्ये ताणव
> सीपीएम आणि भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
> दोन्ही पक्ष परस्परांवर आरोप करत आहेत.
> मेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतरही केरळमधील अनेक ठिकाणांहून राजकीय वादातून हल्ल्ल्यांच्या बातम्या येत होत्या.
> राजकीय विश्लेषकांचे मत आहे की राज्यात सीपीएम आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे.
बातम्या आणखी आहेत...