आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये शांतीसाठी कठोर कारवाई करा, गृहमंत्री राजनाथसिंह यांचे सुरक्षा दलांना निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात एक आठवड्याच्या आत शांतता प्रस्थापित करा, असे निर्देश गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सुरक्षा दलास दिले आहेत. हिंसाचार भडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचनाही गृहमंत्र्यांनी केली आहे.

राजधानी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी एका बैठकीत झालेल्या चर्चेनंतर राजनाथ यांनी हे निर्देश दिले आहेत.

पाच ठिकाणी चकमकींत सात अतिरेक्यांचा खात्मा
काश्मीर खोऱ्यात पाच विविध ठिकाणी झालेल्या चकमकींत सात अतिरेकी मारले गेले. दोन पोलिसही शहीद झाले. पूंछमध्ये एक घर तसेच सरकारी कार्यालयात अतिरेकी घुसले. हे घर एकेकाळी स्व. इंदिरा गांधी यांचे विश्वासू राहिलेले हाजी नजीर यांचे होते. या वेळी चकमकीत तीन अतिरेकी मारले गेले. नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे तीन प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडले. नौगाममध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या चार अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी दीर्घ चकमकीनंतर कंठस्नान घातले.
बातम्या आणखी आहेत...