आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket Betting Caught On India Sri Lanka ODI, Three Bookies Arrested

5th ODI: जयपूरमध्ये 3 कोटींचा सट्टा पकडला, तीन सट्टेबाजांना अटक तर ५० मोबाईल जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: पोलिसांनी अटक केलेले सट्टेबाज

जयपूर -
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान होत असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकन टीम भारतासमोर धावांचे डोंगर उभे करण्यासाठी प्रयत्न करत असताना राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 3 सट्टेबाज या मॅचवर कोट्यवधींचा सट्टा लावत होते. जयपूर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्वरीत कारवाई करत या तीन्ही सट्टेबाजांना ताब्यात घेतले आहे. तसेच सट्ट्यासाठी वापरात येणारे सर्व सामानही जप्त केले आहे.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून जवळपास एक लाख रुपये नकद, 50 मोबाइल फोन जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सट्टेबाजांजवळ अंदाजे 3 कोटी रुपयांच्या पावत्या मिळाल्या आहेत. सध्या पोलिस या सट्टेबाजांची चौकशी करत आहेत.

डीसीपी पूर्व कुंवर राष्ट्रदीप यांनी सांगितले की, आरोपी प्रफुल्ल जैन (वय 25) गाजियाबादचा रहिवाशी आहे. तर इतर दोघे शंकर नगर, ब्रह्मपुरी निवासी प्रकाश नवलानी (वय 35) आणि राजहंस कॉलनी ब्रह्मपुरी रोड निवासी हरीश कुमार सिंधी (वय 48) अशी यांची नावे आहेत.
यामधील सट्टेबाज प्रफुल्ल कुमारने जवळपास दोन महिन्यापूर्वी प्रताप नगरच्या सेक्टर 8 मधील एका प्राध्यापकाचे घर भाड्याने घेतले होते. येथून तो सट्टेबाजी करत होता. रविवारी रांचीत भारत - श्रीलंका यांच्या दरम्यान होत असलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यावर येथे सट्टा लावला जात होता. याची माहिती ठाणे प्रभारी सुर्यवीर सिंह यांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या टीमने घरावर छापा मारला आणि येथील तीन आरोपींना रंगेहात धरले. त्यांच्या खोलीतून 50 मोबाइल फोन, एक लाख रुपये रोकड आणि तीन कोटी रुपयांच्या हिशोबाच्या पावत्या पोलिसांना मिळाल्या. तसेच मोबाईल चार्जर, बॅटरी, लॅपटॉप इत्यादी सामानही पोलिसांनी जप्त केले आहे.
फोटो: विष्‍णु शर्मा