आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket Teams Named After Alleged Militants In Kashmir

J&K मध्ये दहशतवाद्यांच्या नावाने क्रिकेट टीम, लागले \'आझादी\'चे नारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खालिद आर्यन्सचा टीम मेबर ट्रॉफी स्विकारताना - Divya Marathi
खालिद आर्यन्सचा टीम मेबर ट्रॉफी स्विकारताना
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये एका क्रिकेट टुर्नामेंटमध्ये 16 टीम सहभागी झाल्या. विशेष म्हणजे यातील तीन टीमचे नाव हिजबूल मुजाहिदीनच्या कमांडरच्या नावावर ठेवण्यात आले होते. ही स्पर्धा दोन महिने चालली होती.

कोणत्या दहशतवाद्यांची प्रेरणा घेऊन ठेवले नाव
- बुरहान लायन्स, आबिद खान कलंदर्स आणि खालिद आर्यन्स हे तीन ते संघ आहे ज्यांची नावे हिजबूलच्या कमांडरच्या नावावर ठेवण्यात आली होती.
- गेल्या रविवारी ही स्पर्धा संपली आहे.
- एका आयोजकाने सांगितले, की ही स्पर्धा खालिद मुझफ्फर वाणीच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती. खालिद हिजबूलचा दहशतवादी होता. गेल्या वर्षी लष्कराने त्याला एन्काऊंटरमध्ये मारले होते.
- तो त्याच्या भावाला भेटण्यासाठी जंगलात आल्याची माहिती लष्कराला मिळाली होती

पाकिस्तान सुपर लीगची प्रेरणा
- राज्यात झालेल्या टुर्नामेंटमधील टीमची नावे आयपीएल आणि पीएसएल टीमसारखी ठेवण्यात आली होती. पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग.
- पीएसएल याच वर्षी सुरु झाले आहे, मात्र तो फ्लॉप शो मानला जात आहे.
- काश्मिरमध्ये झालेल्या टुर्नामेंटमध्ये दहशतवाद्यांच्या नावाने तीन टीम खेळल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे गेले आहे.
- बुरहान लायन्स ही टीम बुरहान या दहशतवाद्याच्या नावाने आहे. बुरहान मुख्याध्यापकाचा मुलगा आहे. त्याने 2010 मध्ये घर सोडले आणि हिजबूल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला.
- याच प्रकारे आबिद खान कलंदर टीमचे नाव हिजबूलचा कमांडर आबिदच्या प्रेरणेने ठेवण्यात आले होते. आबिद 2014 मध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या एन्काऊंटरमध्ये लष्कराचे एक कर्नल शहीद झाले होते.
- रविवारी संपलेल्या या टुर्नामेंटमध्ये खालिद आर्यन्स चॅम्पियन ठरली आहे.

ओपनिंग सेरेमनीमध्ये लागले 'आझादी'चे नारे
- एका आयोजकाने सांगितले, टीमचे नाव दहशतवाद्यांच्या नावावरुन ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती. 22 फेब्रुवारीला जेव्हा ओपनिंग सेरेमनी झाली तेव्हा काश्मीर्या स्वातंत्र्याचे नारे लागले होते.
- फायनलमध्ये खालिदच्या वडिलांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
- एका आयोजकाने सांगितले, दहशतवाद्यांच्या नावावर टीमचे नाव ठेवणे हे आता येथे नॉर्मल झाले आहे.