आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या गोळीबारात क्रिकेटपटूसह तिघांचा मृत्यू, श्रीनगरमध्ये तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर नईमचा (इन्सेटमध्ये) गोळीबारात मृत्यू झाला. - Divya Marathi
क्रिकेटर नईमचा (इन्सेटमध्ये) गोळीबारात मृत्यू झाला.
जम्मू काश्मीर- हंडवारा येथे सुरक्षा जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका क्रिकेटपटूसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर श्रीनगरमध्ये तणाव पसरला आहे. बंदही पुकारण्यात आला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

मिळालेली माहिती अशी की, लष्कराच्या एका जवानाने तरुणीची छेड काढली होती. या घटनेमुळे स्थानिक लोक संतापले होते. संतप्त जमावाने जवानांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात जवानांनी जमावाच्या दिशेने गोळीबार केला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तणाव पसरला आहे. फुटीरतावाद्यांनी बुधवारी बंद पुकारला आहे. दुसरीकडे, दोषींवर कठोर कारवाई करण्‍यात येईल, असे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आश्वासन दिले आहे.

काय आहे प्रकरण?
- हंडवारा येथे मंगळवाी काही लोकांनी लष्कराच्या एक जवानावर तरुणीची छेड काढल्याचा आरोप केला.
- संतप्त जमावाने दगडफेक केली. इतकेच नव्हे तर लष्कराचे एका बंकरमध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. यानंतर लष्कराच्या जवानांनी जमावावर गोळीबार केला.
- यात राष्‍ट्रीय पातळीवर खेळलेल्या एका क्रिकेटपटूसह तिघांचा मृत्यू झाला.
- नईम कादिर भट असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे.
- मृतांमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे.
- घटनेचे पडसाद श्रीनगरसह पुलवामामध्ये उमटले. पुलवामामध्ये दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे.

फुटीरतावाद्यांनी पुकारला बंद...
- लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
- हुर्रियत नेता सैयद अली शाह गिलानी यांनी बुधवारी काश्मीर बंदची हाक दिली आहे.
- लष्कराने या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

क्रिकेटपटू परवेज रसूलसोबत खेळला होता नईम
- नईम जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय पातळीवर अंडर 19 क्रिकेटमध्ये खेळला आहे.
- नईम गव्हर्नमेंट कॉलेज, हंडवाराचा विद्यार्थी आहे.
- नईम व जम्मू काश्मीरचा स्टार गोलंदाज परवेज रसूलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, लष्करी जवानाच्या गोळीबारात मृत्यू झालेला क्रिकेटपटू नईमचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...