आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Suresh Raina And Priyanka Choudhary Engagement Pictures

पारंपरिक रिती रिवाजानुसार झाला सुरेश रैनाचा साखरपुडा, क्रिकेट किट घेऊन दिल्लीला रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ/गाझियाबाद - टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैना याचा साखरपुडा बुधवारी अतिशय साधेपणाने झाला. यावेळी त्याची बालपणाची मैत्रिण प्रियंका चौधरीचे नातेवाईक, रैनाची बहिण, त्याचे तीन भाई आणि काही जवळचे नातेवाईक हजर होते. शहरातील प्रतिष्ठीत आणि व्हीव्हीआयपी या सोहळ्यात दिसले नाही. साखरपुड्यानंतर लागलीच सुरेश रैना दिल्लीला रवाना झाला. तीन एप्रिल रोजी सुरेश रैना आणि प्रियंकाचा विवाह होणार आहे.
बुधवारी सुरेश रैनाचा साखरपुडा गाझियाबादमधील राजनगर सेक्टर 11 येथील बंगल्यात झाला. यावेळी सुरेश रैनाचे घर सुंदर सजवण्यात आले आहे. साधारण अडीच वाजता प्रियंकाचे वडील चौधरी तेजपालसिंह आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य चार कारमध्ये सुरेश रैनाच्या घरी पोहोचले. साखरपुड्यासाठी आलेले पंडित जवळपास चारवाजता बंगल्यातून बाहेर पडले. प्रियंकाचा भाऊ अभिषेकने परंपरेनुसार चंदनाचा टिळा लावून आणि घड्याळ भेट देली. सखारपुड्यावेळी रैनाने शेरवानी परिधान केली होती. त्यावर लाल रंगाचे जॅकेट चढवले होते. मेरठ येथून आलेल्या पाहुण्यांना रात्री उशिरा सुरेश रैनाचा भाऊ दिनेश आणि नरेश यांनी निरोप दिला.
साखरपुड्यानंतर रैना दिल्लीला रवाना
बुधवारी साखरपुडा झाल्यानंतर सुरेश रैना लागलीच दिल्लीला रवाना झाला. साधारण चार वाजतापर्यंत साखरपुड्याचा विधी आटोपला आणि सव्वाचार वाजता सुरेश रैना दिल्लीसाठी बंगल्याबाहेर पडला. आता लग्नानंतर प्रियंकासह तो गाझियाबाद येथे परतेल अशीही चर्चा होती. बुधवारी सकाळपासूनच सुरेश रैनाच्या बंगल्यामध्ये धावपळ पाहायला मिळत होती. माध्यमांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती, निमंत्रितांशिवाय इतरांना आत जाण्याची बंदी होती. सकाळी 11.30 वाजता सुरेश रैना घराबाहेर पडला कोणाशी काहीही न बोलता तो ऑडी कारमध्ये बसून भरधाव निघून गेला. जवळपास 40 मिनीटानंतर परत आला, तेव्हाही त्याने कोणाशीही संवाद साधला नाही.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, धोनी येण्याची होती शक्यता