आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या शहीद ASI ची मुलगी जोहराच्या शिक्षणाचा खर्च उचलणार गौतम गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात उप निरीक्षक राशिद शहीद झाले होते. त्यांची मुलगी जोहराचा - Divya Marathi
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात उप निरीक्षक राशिद शहीद झाले होते. त्यांची मुलगी जोहराचा
श्रीनगर - काश्मीरमध्ये गेल्या महिन्यात शहीद झालेले जम्मू-काश्मीरचे पोलिसचे उप निरीक्षक अब्दूल राशिद यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च क्रिकेटर गौतम गंभीर उचलणार आहे. गौतमने ट्विट करुन याची माहिती दिली. राशिद गेल्या महिन्यात 28 तारखेला शहीद झाले होते. पित्याला अखेरचा निरोप देताना जोहराचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरले झाले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या डीआयजींनी फेसबुकवर म्हटले होते, 'प्रिय जोहरा, तुझे अश्रू आम्हाला रडवणारे आहेत.'
 
 - जोहराच्या अश्रूंनी अनेकांना भावविवश केले आहे. पाच वर्षांच्या या मुलीचे सांत्वन कोणत्या शब्दात करावे हा सर्वांसमोर प्रश्न आहे. मात्र पित्याचे छत्र हरपल्याने तिचे स्वप्न अपुरे राहू नये यासाठी गौतम गंभीर पुढे आला आहे. 
 - 28 ऑगस्टच्या सायंकाळी अब्दूल राशिद पोलिस स्टेशनकडे निघाले होते. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी फायरिंग सुरु केली. राशिद शहीद झाले. ही घटना अनंतनाग जिल्ह्यातील मेंहदी कदाल येथे घडली. 
- मंगळवारी गौतम गंभीरने ट्विट केले, 'जोहराच्या शिक्षणासाठी आणि तिचे स्वप्न साकार करण्यासाठी मी आयुष्यभर तिला मदत करेल.'
- गंभीरने अतिशय भावनिक होत लिहिले, 'जोहरा मी लोरी गाऊन तुला झोपवू शकत नाही, मात्र तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला मदत नक्कीच करु शकतो. तुझ्या शिक्षणासाठी मी आयुष्यभर तुला मदत करेल.'
- गंभीर लिहितो, 'जोहरा, तुझे अश्रू जमीनीवर पडू देऊ नको, मला शंका आहे, धरित्रीलाही तुझे दुःख सहन होणार नाही? तुझे शहीद पिता अब्दुल राशिद यांना माझा सलाम.'
बातम्या आणखी आहेत...