आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Increase In Bihar After Bjp Jdu Separation With Nda In Nitish Kumar Governance

रँम्बो बनणारे होतील मोगँबो; शकील अहमद यांनी उडवली मोदींची खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा/दिल्ली - भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदींना आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पुढे करत आहेत तर, त्यांचे विरोधक त्यांचे पाय ओढण्यात कुठेच कमी पडत नाहीत. काँग्रेस महासचिव शकील अहमद यांनी आज (गुरुवार) 'रँम्बो' मोदींना 'मोगँबो' ठरवून टाकले.

शकील अहमद यांनी मोदींचे नाव न घेता म्हटले, की मी अनेक दिवसांपासून सांगत आहे, की काही लोक रँम्बो तयार करण्याच्या नादात आहेत, मात्र ते लवकरच मोगँबो होणार आहेत.

अहमद म्हणाले, की रँम्बो आणि मोगँबो ही पात्रे चित्रपटातच चांगली वाटतात. भाजपचे काही लोक त्यांच्या एका नेत्याला रँम्बोच्या रुपात सादर करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की त्यांच्या नेत्याने उत्तराखंडमधील संकटात सापडलेल्या 15 हजार लोकांना एकाच वेळी वाचवले. ही हस्यास्पद बाब आहे. यामुळे त्या व्यक्तीचीच विश्वासार्हता कमी होते.

अहमद यांच्या या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले, की मोदींचे नाव घेतल्याशिवाय काँग्रेसच्या काही नेत्यांची सकाळच होत नाही. जोपर्यंत ते मोदींना शिव्या - शाप देत नाही तोपर्यंत त्यांच्या पोटात दुखत राहाते. मोदींच्या नाम जपानेच यांचा दिवस सुरु होतो. ते म्हणाले, की येणारा काळच सांगेल, की कोण रँम्बो आहे आणि कोण मोगँबो?