आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंडक्टरने गुन्हा कबुल केला, म्हणाला- बुद्धी भ्रष्ट झाली होती, मुलाच्या गळ्यावर केले दोन वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाचा शुक्रवारी सकाळी खून झाला होता. त्याचे वडील 15 मिनिटांपूर्वीच त्याला सोडून गेले होते. - Divya Marathi
मुलाचा शुक्रवारी सकाळी खून झाला होता. त्याचे वडील 15 मिनिटांपूर्वीच त्याला सोडून गेले होते.
गुडगाव - रेयान इंटरनॅशन स्कूलमध्ये 7 वर्षांच्या मुलाचा खूनाचा आरोपी कंडक्टर अशोक कुमारने गुन्हा कबूल केला आहे. अशोकने मीडियाला सांगितले की त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. तो प्रद्युम्नसोबत चुकीचे काम करत होता. मुलाने आरडाओरड केली म्हणून चाकूने त्याचा गळा चिरला. अशोकने सांगितले की त्याने दोनवेळा प्रद्युम्नच्या गळ्यावर वार केले. पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच अशोकला लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या आरोपात अटक केली होती. 
 
गुडगाव मधील भोंडसी येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत असणाऱ्या मुलाची शुक्रवारी सकाळी हत्या करण्यात आली. गुडगावचे डीसीपी यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की, स्कुल बसच्या कंडक्टरने हत्येपुर्वी मुलासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने आरडाओरड करण्यास सुरूवात केल्यानंतर घाबरलेल्या कंडक्टरने त्याची हत्या केली. अशोक कुमार असे या कंडक्टरचे नाव आहे. शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या मुलाचे वय 7 वर्षे होते. मृत मुलाचे नाव प्रद्युम्न असून तो गुडगावमधील शामकुंज येथे राहात होता. 
 
8 महिन्यापूर्वीच शाळेत कामाला 
- आरोपी अशोक 8 महिन्यापूर्वीच शाळेत बस कंडक्टर म्हणून कामाला लागला होता. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, 'माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या स्वच्छतागृहात होतो. मी तिथे चुकीचे काम करत होतो. तेव्हाच तो मुलगा आला. त्याने मला पाहिले. पहिले मी त्याला धक्का दिला, मग आत ओढले. तेवढ्यात तो ओरडायला लागला. मग मी त्याच्या गळ्यावर चाकूने दोनदा वार केले.'
- जेव्हा त्याला विचारण्या आले की याआधीही तु मुलांसोबत असे केले होते का, त्यावर आरोपी म्हणाला, 'नाही, ही पहिलीच वेळ होती. मी घाबरलो होतो. माहित नाही हे सर्व कसे झाले. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी त्याच्यासोबत चुकीचे काम करणार होतो, पण केले नाही.'
- अशोकला चाकूबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, 'तो भाजी चिरायचा चाकू होता. घाण झाला होता म्हणून धुण्यासाठी टॉयलेटपर्यंत घेऊन आलो होतो. त्यानेच मुलाचा गळा चिरला.'
- मुलांच्या टॉयलेटमध्ये जाण्यापासून तुला कोणी अडवले नाही का, या प्रश्नावर तो म्हणाला, 'आम्ही तिथे नेहमी जात होतो, कोणी पाहिले तर तेवढ्यापुरते बोलत होते.'
 
मुलाच्या मृत्यूनंतर उपस्थित झाले 5 प्रश्न 
 
#1. कंडक्टर मुलांच्या टॉयलेटमध्ये कसा पोहोचला? 
- मुलांच्या टॉयलेटमध्ये दुसऱ्या कोणालाही जाण्याची परवानगी नाही. शिक्षकही तिथे जाऊ शकत नाही. 
- असे असताना कंडक्टर सांगतो की तो आणि त्याचे सहकारी ड्रायव्हर - कंडक्टर हे नेहमी मुलांचे टॉयलेट वापरतात. 
- यामुळे प्रश्न निर्माण होतो की शाळा प्रशासन मुलांच्या सुरक्षिततेबाबात गंभीर होते का?
#2. कंडक्टर चाकू घेऊन टॉयलेटमध्ये काय करत होता?
- कंडक्टर बऱ्याच दिवसांपासून सोबत चाकू बाळगत होता. त्याच्याकडे असलेल्या चाकूवर कधीच कोणाची नजर कशी पडली नाही. 
- तो म्हणाला की चाकू खराब झाला होता त्याला स्वच्छ करण्यासाठी बाथरुममध्ये गेलो होतो. चाकू पाहिल्यानंतर तो नवाच वाटतो. त्यामुळे त्याच्या म्हणण्यात काही तथ्य वाटत नाही. 
- मग प्रश्न उरतो की कंडक्टर चाकू घेऊन टॉयलेटमध्ये काय करत होता?  
#3. मुलावर हल्ला झाल्यानंतर तो कितीवेळ जिवंत होता?
- मुलाला त्याच्या वडिलांनी सकाळी 7.55 वाजता शाळेत सोडले होते. 
- दुसऱ्या मुलांनी बाथरुममध्ये प्रद्युम्नला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. शाळा प्रशासनाने 8.10 वाजता त्याच्या वडिलांना फोन करुन माहिती दिली. 
- मुलाला हॉस्टिलमध्ये नेण्यात आले, त्याचे वडील 9 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 
- म्हणजे प्रद्युम्नचा मृत्यू नेमका केव्हा झाला? 
#4. मुलाच्या मृत्यूनंतरही शाळा कशी काय सुरु होती? 
- सर्वसाधारण पणे शाळेत अशा प्रकारची घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांना तत्काळ घरी सोडले जाते. 
- शाळेत मुलाचा मृतदेह सापडल्याचे मीडियामधुन कळाल्यानंतर पालक शाळेत पोहोचले तोपर्यंत मुलांना सोडलेले नव्हते. 
- अनेक पालकांचे म्हणणे आहे की या घटनेने आमच्या मुलांना धक्का बसला आहे. अजूनही ते भयभीत आहेत. 
- काही पालक म्हणाले की मुलांच्या मनात भीतीने घर केले असून या घटनेनंतर त्यांनी ते अन्नाला शिवलेले नाहीत. 
#5. शाळेत मुलाची हत्या झाल्यानंतर प्रशासनाने काय पाऊले उचलली? 
- शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर दिवसभर निदर्शने आणि पोलिस कारवाई सुरु होती, मात्र शाळेकडून कोणालाही जबाबदार धरण्यात आले नाही आणि त्याच्यावर कारवाईही झाली नाही. 
- पालकांचा संताप पाहून शाळा प्रशासनाने शनिवारी प्राचार्यांना निलंबित केले. 
- शाळेच्या सुरक्षा एजन्सीवर पोलिस कारवाई करणार असल्याचे गुडगावच्या डीसीपींनी सांगितले. मात्र शाळेने कोणतीही कारवाई केलेली नाही. 
कंडक्टरच्या खिशात सापडला चाकू...
डीसीपींनी सांगिलत्या नुसार, कंडक्टरने आपल्या खिशात चाकू ठेवला होता. तो शाळेचे टॉयलेट यूज करण्यासाठी गेला, तिथे त्याने मुलाला पाहिले आणि त्यानंतर त्याने हे कृत्य केले. कंडक्टर मागिल 6 महिन्यांपासून शाळेत काम करत होता.
 
घरातून व्यवस्थित गेला होता मुलगा
मुलाचे वडील वरुण यांनी सांगितले, की शुक्रवारी सकाळी मुलगा व्यवस्थित शाळेत गेला होता. काही वेळातच शाळेतून शिक्षकांचा फोन आला. त्यांनी सांगितले, मुलाची तब्ब्यत बिघडली आहे. शाळा प्रशासनानेच त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. 
- पालक हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुलाचा मृत्यू झाल्याचे कळाले आणि त्यांना धक्का बसला. 
 
मुलाने टॉयलेटमधून बाहेर येण्याचा केला प्रयत्न...
- मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निशान होते.
- पोलिसांनी चौकशीदरम्यान शाळेतील 30 सीसीटीव्ही फुटेज तपासले.
- पोलिसांच्या मते, हल्ल्यानंतर मुलाने टॉयलेटमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी शाळेतील इतर मुलांनी त्याला पाहिले. मुलांनी ही घटना शाळेच्या माळीला सांगितली. त्यानंतर शाळेच्या मॅनेजमेन्टने तात्काळ जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
बातम्या आणखी आहेत...