आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा विवाह करणाऱ्या पतीला भर मंडपात पत्नीने बदडले, तक्रार दाखल होताच पती फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांका- विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे भासवून दुसरा विवाह करण्यासाठी बोहल्यावर चढलेल्या पतीला पत्नीने भर मंडपात पाहुण्यांच्या साक्षीने जबरदस्त चोप दिला. इतक्यावरच थांबता तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पती फरार झाला.

ही घटना बिहारमध्ये बांका जिल्ह्यात शंभूगंज तालुक्यातील वारसावाद गावात घडली. खगडिया जिल्ह्यातील सलाहपूर गावातील सुरज यादव या तरुणाने संध्यासोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला हाेता. सात महिने तिच्यासोबत संसार केल्यानलंतर तो दुसरा विवाह करण्यासाठी बोहल्यावर चढला होता. आपला पती दुसरा विवाह करत असल्याची माहिती मिळताच पत्नी संध्याने न्यायाची मागणी करत शंभूगंज ठाण्यात धाव घेतली. परंतु पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. हे पाहून तिने आईसह थेट विवाह मंडपातच धाव घेतली. तिने सर्व उपस्थितांना वस्तुस्थिती सांगून नवरदेवाचे खरे रूप उघडे पाडले. पतीला सर्वांसमक्ष जोरदार चोप दिला त्याच्याविरोधात ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकारानंतर नवरदेव सुरज फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...