आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात दोघांचा मृत्यू, मारहाणीत ठाणेदार ठार, जमावाचे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाजीपूर- बिहारच्या हाजीपूरमध्ये रस्ता अपघातात नात-आजोबांच्या मृत्यूनंतर लालगंजच्या अगरपूर गावात हिंसाचार उसळला. संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी आरोपी व्हॅनचालकासह अनेक लोकांच्या घरांना आगी लावल्या. बचावासाठी आलेल्या पोलिस पथकावर हल्ला केला. ग्रामस्थांनी बेलसर ठाण्याचे प्रभारी अजितकुमार यांना इतकी मारहाण केली की रुग्णालयात नेतानाच त्यांचा मृत्यू ओढवला.
अगरपूर गावात एका व्हॅनने चिरडल्याने राजेंद्र चौधरी आणि त्यांची वर्षीय नात मायाकुमारीचा मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबीयांनी व्हॅनचालक रिझवानवर हत्येचा आरोप केला. रिझवानने सोमवारीच चौधरी यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याला अटक झाल्याने ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला. यात १५ वर्षांच्या राकेश सिंहचा मृत्यू, तर वर्षांचा विकास महातो गंभीर जखमी झाला. रिझवान फरार झाला आहे.