रांची / हजारीबाग (झारखंड) - राज्यातील हजारीबाग कोर्ट परिसरात मंगळवारी दुपारी एका गँगस्टरला हजर केले जात असताना अज्ञात बाइक स्वारांनी त्याच्यावर हल्ला केला. बाइक स्वारांनी एके 47 रायफलने फायरिंग केली आणि बॉम्ब फेकला. त्यानंतर ते फरार झाले. सुनावणीसाठी आणण्यात आलेल्या इतर दोन कैद्यांना गोळ्या लागल्या ते जागीच ठार झाले तर गँगस्टरला उपचारांसाठी रांचीला घेऊन जात असताना निधन झाले. हल्ल्यात एक हवलदार, एक क्लार्क आणि एक वकील जखमी झाला.
पोलिसांनी घटनास्थळावरुन एके-47 रायफल जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले, की हल्लेखोरांनी 30 राउंड फायर केले. हजारीबागचे पोलिस अधिक्षक अखिलेश झा म्हणाले, 'पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरु केली आहे.' झारखंड पोलिसचे एडीजी आणि प्रवक्ते एस.एन. प्रधान यांनी बॉम्ब हल्ल्याचे वृत्त फेटाळले आहे.
कोल माफियांचे गँगवॉर
सुशील श्रीवास्तवच्या लोकांनी गँगस्टर भोला पांडे आणि किशोर पांडेची हत्या केली होती. त्याआधी पांडेच्या टोळीने सुशील श्रीवास्तवच्या पत्नीची रांचीत गोळ्या झाडून हत्या केली होती. सुशीलच्या रांची येथील निवासस्थानी देखील फायरिंग झाली होती. सुशील श्रीवास्तव कधीकाळी भोला पांडेचा शार्पशुटर होता. भोलाची 2000 मध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा पुतण्या किशोर पांडे याने टोळीची सूत्रे हाती घेतली. त्याची हत्या जमशेदपूर येथे करण्यात आली. या दोन्ही टोल्या रामगड आणि हजारीबाग येथे अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. ते कोळसा माफिया आहेत. त्यांची कोट्यवधीची उलाढाल आहे. मंगळवारच्या घटनेमागे किशोर पांडेचा भाऊ विकास तिवारी असल्याची चर्चा आहे. तोच आता पांडे टोळीचा म्होरक्या आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, घटनेशी संबंधित छायाचित्रे