आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बायकांचा खर्च भागवण्यासाठी पोलिस शिपाई चक्क बनला चोरांच्या टोळीचा म्होरक्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - दोन बायकांचा खर्च भागवण्यासाठी लखनऊमध्ये एक पोलिस शिपाई चक्क चोरांच्या टोळीचा म्होरक्या बनला आणि पोलिसांची वर्दी घालूनच लूटमार करू लागला. एका लष्करी अधिका-याच्या लुटीचा तपास करताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
१३ सप्टेंबर रोजी माणकनगर रेल्वेस्टेशन परिसरात झालेल्या लूटमारीच्या तपासात लूटमार करणा-यांपैकी एक जण पोलिसांच्या वर्दीत असल्याचे निष्पन्न झाले.
जीआरपीने रेल्वेस्टेशन परिसराची रेकी सुरू केली असता शनिवारी सकाळी टोळीचा म्होरक्या पकडला गेला. त्याचे नाव वीरेंद्र यादव असून तो पोलिस शिपाई आहे. दोन बायकांचा खर्च परवडत नसल्यामुळे लूटमार करत असल्याचे त्याने कबूल केले आहे.