आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किंलिंग? गर्भवती युवती आणि विवाहित प्रियकराला मारून झाडाला टांगले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड) - झारखंडची राजधानी रांची येथील मुरी रेल्वे स्टेशनजवळील झाडीत बुधवारी सकाळी एका झाडाला युवक आणि युवतीचा मृतदेह टांगलेला आढळून आला. स्थानिकांनी या घटनेची माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवले आणि पोस्टमॉर्टमला पाठवले. हे प्रेमी जोडपे होते. युवतीच्या नातेवाईकांनी दोघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह झाडाला लटकवले असण्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

युवक आणि युवतीचे गाव घटनास्थळापासून जवळच आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, युवक पश्चिम बंगालच्या झालदा येथील होता तर, युवती दुरदाग गावातील होती. मृत युवकाचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता, तर त्याच्यासोबत झाडाला लटकवलेली युवती अविवाहित होती. युवकाच्या लग्नानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातच तिला गर्भधारणा झाली होती. याची भणक तिच्या कुटुंबियांना लागली होती. पोलिसांना शंका आहे, की युवतीच्या कुटुंबियांनीच दोघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह झाडाला टांगले असावे.
युवक रांचीमधील एका हॉस्टेलमध्ये कुकचे काम करत होता. मंगळवारी दोघांना मुरी स्टेशनजवळ पाहिले गेले होते. बुधवारी सकाळी दोघांचे मृतदेह स्वर्णरेखा नदी किनारी असलेल्या झाडाला टांगलेले आढळले. येथे वाहन देखील येऊ शकत नाही अशा ठिकाणी त्यांचे मृतदेह टांगले होते. पोलिसांनाही त्यांचे वाहन काही अंतरावर सोडून पायी चालत घटनास्थली यावे लागल