आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना लिपिक चतुर्भुज, सर्वांसमक्ष उतरवली पँट; टॉवेलवर घेऊन गेले अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पलामू (झारखंड) - झारखंडमधील नक्षल प्रभावित पलामू जिल्ह्यातील पांकी ब्लॉक ऑफिसवर छापा मारून लाललुचपत प्रतिबंधक विभागाने एका सहायक लिपिकाला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लिपिकाचे नाव मनमोहन प्रसाद असून तपास अधिकार्‍यांनी चौकशीसाठी मनमोहन प्रसादची कार्यालयातच पँट उतरवली. त्याला अटक करुन नेत असताना देखील पँट परत करण्यात आली नाही. अधिकार्‍यांनी त्याला टॉवेल दिला, आणि टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच त्याला गाडीत बसवण्यात आले.
लिपिकाने मागितले 50 हजार रुपये
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या डीएसपी मिथलेश कुमार यांनी सांगितले, 'बान्दूबार येथील कंत्राटदार शैलेंद्र कुमार याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ता बांधण्याचे काम केले. त्या कामाचे त्याला सहा लाख पन्नास हजार रुपयांचे बिल देणे बाकी होते. या बिलाचा चेक लिपिक मनमोहन प्रसादकडून दिला जाणार होता. त्याने चेक काढण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. शैलेंद्र कुमारने याची माहिती राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यांनी टीम तयार करुन सापळा रचला आणि मनमोहन प्रसादला रंगेहाथ अटक केली.'
केमिकल लावलेल्या नोटा दिल्या मनमोहनच्या हातात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार शैलेंद्र कुमारकडे केमिकल लावलेल्या दहा हजार रुपयांच्या नोटा दिल्या. शुक्रवारी त्याने अधिकार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे प्रसादच्या हातात नोटांचे बंडल ठेवले आणि तिथे दबा धरून असलेल्या अधिकार्‍यांनी मनमोहनला रंगेहात पकडले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा