आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरावावरुन परतणार्‍या राष्ट्रीय कबड्डीपटूची भर रस्त्यावर निर्घुण हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रिठाल गावात एका राष्ट्रीय कबड्डीपटूची भररस्त्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. सुखविंदर सिंग असे कबड्डीपटूचे नाव आहे. स्कूटीवरुन आलेल्या दोन मारेकऱ्यांनी सुखविंदरवर जवळून गोळ्या झाडल्या. नंतर स्कूटीवर बसून तिथून पसार झाले. मंगळवारी ही घटना घडली. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे.

मिळालेली माहिती अशी, सुखविंदर मंगळवारी सराव करून घराकडे निघाला होता. त्याचवेळी स्कूटीवरुन दोघे मारेकरी आले आणि त्यांनी सुखविंदरवर जवळून गोळ्या झाडल्या. सुखविंदरच्या छातीत एक गोळी लागली. तो जागीच ठार झाला. सुखविंदरला तातडीने पीजीआय रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हत्याकांड प्रकरणी रोहतक पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकर्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही फूटेज पाहाण्याचा काम करत आहे. तोच या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे पोलिसांन‍ी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...