आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२.८ कोटींची थकबाकी न दिल्याने सोनिया गांधींवर दिवाणी दावा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - केरळच्या एका बांधकाम कंपनीने २.८ कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही म्हणून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह चार नेत्यांच्या विरोधात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे.

राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजच्या इमारत बांधकामाच्या बदल्यात ही रक्कम देणे अपेक्षित होते. कंपनी व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार सोनिया गांधी यांना अगोदर कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतरही थकबाकी मिळाली नाही. अखेर कंपनीने सत्र न्यायालयात धाव घेतली. आता कंपनीने २०१३ पासून व्याजासह रक्कम हवी आहे. काँग्रेसच्या अन्य चार नेत्यांच्या विरोधातही तक्रारीनंतर दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे.

त्यात इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रमेश चेन्नीथला, केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष व्ही. के. सुधीरन, माजी मुख्यमंत्री आेमन चंडी, संस्थेचे संचालक हिदुर मोहंमद यांचा समावेश आहे. इन्स्टिट्यूटचे उद्घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते २००५ मध्ये करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...