आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

39 महिलांच्या आयुष्याशी खेळला ढोंगी मौलाना, तांत्रीक असल्याचे सांगून करायचा असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलाहाबाद- हत्येच्या प्रकरणात 33 वर्षांनंतर अटक करण्यात आलेला आरोपी आणि मौलाना बनून 39 महिलांसोबत हलाला करणारा कैदी आफताफ उर्फ नाटे याचा उपचारादम्यान मृत्यू झाला. पोलीसांनी 24 ऑगस्टला या इनामी चालाख गुन्हेगाराला तामीळ फिल्ममध्ये अभिनय केलेले एनकाउंटर स्पेशलिस्ट अनिरूद्ध सिंह यांनी इलाहाबादचे एडीजी एस. व्ही. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली.

मौलाना करीम बंद करत होता झाड-फूक...
- आफताब उर्फ नाटेवर इलाबाद पोलीसांनी 12 हजार रूपयांचे बक्षिस घोषित केले होते. एस पी सिद्धार्थ मीणा यांनी सांगितले की, नाटे 1985 पासून फरार घोषित करण्यात आला आहे.
- नाटे नाव बदलून मौलाना करीमच्या नावाने फिरत होता. तो मुंबई, सूरत, अजमेर आणि फर्रुखाबाद येथील मस्जितींमध्ये लपत होता.
- नाटे मस्जितमध्ये आलेल्या लोकांना आपण तांत्रिक असून भूत-प्रेत पळवून लावतो असे सांगत होता. यामुले लोक त्याच्या जाळ्यात अडकत होते आणि तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता.

39 महिलांच्या आयुष्याशी खेळला...
- एस पी सिद्धार्थ यांनी सांगितले की, नाटे स्वत:ला हलाला निकाहाचा ज्ञानी असल्याचे सांगत होता. चौकशी दरम्यान त्याने 39 महिलांचा हलाला केल्याची कबूली दिली आहे. त्याने लोकांना धोका तर दिलाच आणि त्यांच्याकडून लाखो रूपये सुद्धा उकळले.
     
या धोकेबाजीच्या व्यावसायासाठी त्याने एक नेटवर्क तयार केले होते. 33 वर्षात त्याने स्वत:ला सिद्ध मौलाना असल्याचे सांगत एक डझनपेक्षाही जास्त शिष्यांची टीम बनवली होती. हे शिष्य त्याच्या तंत्र-मंत्रच्या विद्येचा प्रचार-प्रसार करत होते. मोलाना करीम या नावाने तो सर्व गुन्हेगारीचे काम करत होता. परंतु, त्याने कुठेच आपले आयडी प्रुफ दिले नाही.

प्रत्येक 15 दिवसात बदलत होता सिमकार्ड
- पोलीसांपासून वाचण्यासाठी तो प्रत्येक 15 दिवसांत सिमकार्ड बदलत होता. गुप्त पद्धतीने परिवाराशी कनेक्ट राहत होता.
- पोलीसांनी कुटुंबाची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यच्याविषयी कसलीही माहिती नसल्याचे सांगितले. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की नाटेशी त्यांचा काहीही संबंध नाही. तो आमच्यावर अॅसीड फेकून पळाला होता तेव्हापासून तो परतला नाही.
- पोलीसांनी कुटुंबाचा नंबर सतत सर्व्हिलान्सवर ठेवला आणि यामुळेच नाटेचा पत्ता सापडला.

बॉलीवुड स्टाइलमध्ये झाली अटक...
- 26 एनकाउंटर केलेले इन्स्पेक्टर अनिरूद्ध सिंह यांनी सांगितले की, आम्ही एका महिण्यापासून तपासाचा वेग वाढवला होता. आफताब उर्फ नाटे एका कार्यक्रमात येणार असल्याची माहिती मिळाली. आम्ही तेथे पोहोचलोच होतो, पण तो चकमा देऊन पसार झाला.
- आम्ही त्याच्या कुटुंबाचा नंबर सर्व्हिलान्सवर ठेवला होता. त्यामुळे आम्हाला त्याचा जूना सहकारी नवाबविषयी समजले. आम्ही त्याला अटक केली. आधी त्याने नाटक केले. नंतर कडक कारवाई केल्यानंतर त्याने नाटेची माहिती सांगितली. 
- नवाबने सांगितले की, नाटे पीर बाबाच्या मजारवर एका माणसावर जादूटोना करण्यासाठी आला होता. त्या परिवाराकडून त्याचा नंबर मिळेल.
 
पुढील स्लाइडवर वाचा, सिने स्टाइलने केली अटक....
बातम्या आणखी आहेत...